आपण आहोत त्यापेक्षा अधिक तरुण, सुंदर, आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. कोणी आपल्याला आहोत त्यापेक्षा कमी वयाचं म्हटलं की त्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असतो. याबाबतीतला महिलांचा आनंद तर विचारायलाच नको. म्हणूनच तर अगदी मेकअप करताना, कपडे निवडताना, हेअरस्टाईल करताना बऱ्याच जणी अतिशय जागरुक असतात. पण तरीही कधी काही चुका होतात आणि आपण नेमक्या आहोत त्यापेक्षा जास्त वयाच्या दिसू लागतो. आपल्या एकंदरीतच व्यक्तिमत्त्वावर एक प्रौढपणाची, वयस्करपणाची छटा दिसू लागते (5 tips to look more young and attractive). म्हणूनच अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला जास्त पोक्त बनवितात, ते पाहूया..(avoid 5 mistakes that gives you aged look)
कमी वयाचे, जास्त सुंदर आणि अधिक आकर्षक दिसण्यासाठी टिप्स...
१. बऱ्याच जणी सणासुदीला तयार झाल्यावर कानात खूप मोठे झुमके घालतात. मान थोडी वाकडी केली तर अगदी खांद्याला टेकू शकतील एवढे ते लांब असतात. असे खूप लांब कानातले घालणं टाळा. त्याऐवजी मध्यम आकाराचे किंवा टॉप्स प्रकारातले कानातले निवडा. ते जास्त स्मार्ट लूक देतात.
दिवाळीचा थकवा गेलाच नाही- फराळ खाऊन वजनही वाढलं? ५ टिप्स- शरीर डिटॉक्स होऊन वजन उतरेल
२. कानातले, गळ्यातले, बांगड्या असं सगळं काही कपड्यांनुसार परफेक्टली मॅच करण्याचा काळ आता नाही. हल्ली कॉन्ट्रास्ट मॅच होणारे दागिने जास्त ट्रेण्डी आहेत. तसेच दागिन्यांचे तेच ते प्रकार घालण्यापेक्षा ट्रेण्डी दागिन्यांची निवड करा.
३. केस खूप घट्ट आवळून बांधू नका. जेवढं तुम्ही त्यांना सैलसर बांधू शकाल तेवढं चांगलं. केसांचा पाेनी, बन असं काही घालण्यापेक्षा ते मोकळे सोडले तर अधिक चांगले.
नेहमी फोडणीचाच भात कशाला? उरलेल्या भातापासून करा २ चटपटीत रेसिपी- सगळ्यांनाच खूप आवडतील
४. केसांचा पोनी किंवा बन घालायचा असेल तर केसांचा भांग पाडून दोन भाग करू नका. यामुळे तुम्ही जास्त प्रौढ दिसता. भांग न पाडता केस तसेच मागे वळवा.
५. मेकअप करताना फाउंडेशन आणि ब्लशचा खूप वापर करू नका. कारण त्यामुळे तुमचा चेहरा खूप कृत्रिम, वयस्कर दिसू लागतो.