Join us  

हेअर कलर केसांवर जास्त दिवस टिकतच नाही, ५ चुका टाळा.. हेअर कलर दिसेल नवनवा सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 8:25 PM

Hair Colour Tips: हेअर कलर केल्यानंतर केसांवरचा रंग खूपच कमी दिवसात उडून जात असेल तर या काही चुका करणं टाळा.. रंग अनेक दिवस दिसेल फ्रेश आणि नवानवा..

ठळक मुद्देहेअर कलर लगेचच काही दिवसांत फिकट दिसत असेल तर या काही चुका करणं टाळायलाच पाहिजे.

हेअर कलर (hair colour) केल्यानंतर तो थोडा जास्त दिवस टिकावा, लगेच फिकट होऊ नये, असं वाटणं अगदी साहजिक आहे. कारण आपण भरपूर पैसे खर्च करून केसांना कलर केलेलं असतं. शिवाय हेअर कलर केल्याने आपला लूकही बदललेला असतो. त्यामुळे हा नवा फ्रेश लूक अधिक दिवस टिकावा असं वाटतंच. शिवाय वारंवार केसांना रंगविण्यात पैसे खर्च करणंही खिशाला परवडणारं असतं. म्हणूनच तर या बघा काही टिप्स..(avoid these mistakes To Make Your Hair Colour Last Longer)  हेअर कलर लगेचच काही दिवसांत फिकट दिसत असेल तर या काही चुका करणं टाळायलाच पाहिजे.

 

हेअर कलर अधिक दिवस टिकावा म्हणून...१. केस खूप जास्त धुवू नकाकेसांचा रंग लवकर फिकट होण्याचं मुख्य म्हणजे केस गरजेपेक्षा खूप जास्त वेळा धुणे. वारंवार शाम्पू करून केस धुतल्याने केसांचा रंग लवकर निघून जातो. यासाठी आठवड्यातून दोन वेळा केस धुवा. मधे जर गरज पडलीच तर ड्राय शाम्पूचा वापर करा. तसेच केस धुताना खूप जास्त शाम्पू वापरणेही टाळायला पाहिजे.

 

२. योग्य प्रोडक्ट्सची निवडसामान्य केस धुणं आणि कलर केलेले केस धुणं, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळी उत्पादनं वापरायला पाहिजेत. त्यामुळे खास कलर केसांसाठी अनेक प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर बाजारात मिळतात. कलरचा अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी तिच उत्पादने वापरा. फक्त त्यामध्ये सल्फेट, अल्कोहोल हे घटक नाहीत ना, हे एकदा तपासून बघा. 

 

३. केसांवर हिटिंग नकोहेअर स्ट्रेटनिंग किंवा कर्ल असे कोणतेही प्रयोग जेव्हा आपण केसांवर करतो, तेव्हा केसांना खूप जास्त उष्णता सहन करावी लागते. एरवीही असे प्रयोग केसांवर वारंवार करू नयेतच. पण जर हेअर कलर केले असतील, तर मात्र असे प्रयोग करणे टाळावे. कारण उष्णतेमुळे केसांचा रंग लवकरच फिका होऊ शकतो.

 

४. खूप सुर्यप्रकाश टाळातिव्र उन्हामुळे केसांचा रंग निश्चितच लवकर फिका होतो किंवा डल दिसू लागतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे रणरणत्या उन्हात जाणे टाळावे. जाणे अगदीच गरजेचे असल्यास केस स्कार्फने व्यवस्थित कव्हर करून घ्यावेत. तसेच केसांना SPF लेव्हल चांगले असणारे leave-in conditioner लावावे. 

 

५. केसांचे भांग बदलत रहाकेसांचा भांग किंवा केसांचे वळण वारंवार बदलत रहावे. असे केल्यानेही हेअर कलर अधिक दिवस टिकण्यास मदत होते. एकच एक पद्धतीने भांग पाडला किंवा हेअरस्टाईल केली तर त्या भागातले केस लवकर डिहायड्रेट होतात आणि त्यांचा रंग लवकर उडतो. त्यामुळे केसांचा भाग आणि हेअरस्टाईल बदलत रहा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी