सुंदर, लांब नखं तुमच्या हातांच्या सौंदर्यात अधिकच भर पाडतात. परंतु हिवाळ्यात शक्यतो, वातावरणातील कोरडेपणामुळे आपली नखं वारंवार तुटतात आणि त्यांच्या आसपासची त्वचा कोरडी (How to take care of nails during winter) पडून निघू लागते. हिवाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे आपले केस, त्वचा आणि नखं (Nail Care Secrets for the Winter Months) यांना एक प्रकारचा ड्रायनेस येतो. नखांना ड्रायनेस आल्यास एवढ्या मेहेनतीने वाढवलेली नखं लगेच तुटू लागतात. एवढेच नव्हे तर आसपासची त्वचा उकलून निघते. हिवाळ्यात असे होणे अगदी कॉमन आहे परंतु यामुळे नखं आणि त्वचा यांवर थंडीचा झालेला वाईट परिणाम दिसून येतो(How to avoid dry hands damaged nails this Winter).
नखं सुंदर दिसावीत म्हणून आपण त्यांना मेनिक्युअर करतो, नेलपॉलीश लावून ती आणखीन सुंदर करतो. अशाप्रकारे नखांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून आपण अनेक प्रकारे त्यांची काळजी (5 tips to take perfect care of your nails in winter) घेतो. काहीवेळा हिवाळ्यात नखांची इतकी काळजी घेऊनही अनेक समस्या निर्माण होतात. एवढंच नाही तर हिवाळ्यात नखांची योग्य काळजी घेतली नाही तर ती कोरडी पडून त्यांच्यावरचा नैसर्गिक ग्लो हरवतो आणि नखं डल, निस्तेज दिसू लागतात. याचबरोबर नखांना वारंवार येणाऱ्या कोरडेपणामुळे नखं हळुहळु पिवळी पडू लागतात, असे होऊ नये म्हणून हिवाळ्यात नखांची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात.
हिवाळ्यात नखांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी...
१. बेकिंग सोडा आणि पाणी :- हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नखांसाठी आपण बेकिंग सोडा आणि पाण्याचा वापर करु शकता. यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. आता बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणात हात २० ते २५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर हात कापसाच्या बोळ्याने स्वच्छ पुसून घ्यावेत. या साध्यासोप्या टिप्समुळे हिवाळ्यातही आपली नखं न तुटता त्यांची वाढ चांगली होईल.
लग्न ठरलंय आणि चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवाय? खा हिवाळ्यातले ५ सुपरफूड, चेहरा चमकेल सोन्यासारखा...
२. बदाम किंवा खोबरेल तेल :- थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने आपली नखं वारंवार तुटतात किंवा त्यांना एक प्रकारचा कोरडेपणा येतो. अशावेळी भरपूर पाणी पिऊन हिवाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवावे. याचबरोबर, नखांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी नखांना बदाम किंवा खोबरेल तेलाने हलकेच मालिश करून घ्यावे.
३. लिंबू :- हिवाळ्यात नखं कोरडी पडून डल, निस्तेज दिसू लागतात. काहीवेळा या कोरडेपणामुळे नखांचा रंग बदलून ती पिवळी दिसू लागतात. अशावेळी एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्या पाण्यांत २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. या पाण्यांत आपले हात २० ते २५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर हात स्वच्छ पुसून हातांवर मॉइश्चरायझर क्रिम लावून हलकेच मसाज करा. यामुळे हिवाळ्यात नखांना आलेला कोरडेपणा तर दूर होतोच शिवाय पिवळेपणा देखील कमी होतो.
सायीत फक्त ‘हा’ पदार्थ कालवून लावा, चेहऱ्यावर येईल चमक-महागड्या मॉइश्चरायझरपेक्षा असरदार उपाय...
४. सकस व संतुलित आहार घ्यावा :- हिवाळ्यातही नखं निरोगी ठेवायची असतील तर त्यांना योग्य पोषण मिळणेही आवश्यक आहे. कॅल्शिअम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच आणि नखेही मजबूत होतील. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी प्या. हिवाळ्यात योग्य प्रमाणांत पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा यामुळे आरोग्यासोबतच नखांची देखील चांगली वाढ होते.
चेहऱ्यावरची पुरळ कमी करण्यासाठी मलायका अरोराचा हा खास ‘देसी’ उपाय, ॲक्ने होईल कमी लवकर...
५. हँड मॉयश्चरायजरचा वापर करा :- हिवाळ्यात आपण फक्त त्वचेचीच जास्त काळजी घेतो. मात्र आपल्या हातांकडे आपलं दुर्लक्ष होतं. यामुळे नखं कमकुवत होऊ लागतात आणि ती फार पटकन तुटतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे व त्यांना नीट मॉयश्चरायझर वापरणे अधिक महत्वाचे ठरते. रात्री झोपण्यापूर्वी नखांना हँड मॉयश्चरायजर लावून मालिश करा. याशिवाय तुम्ही पेट्रोलियम जेलीचाही वापर करू शकता.