Lokmat Sakhi >Beauty > केसांसाठी ५ प्रकारचे होममेड हेअर स्प्रे! केसांची नेमकी समस्या ओळखा आणि त्यानुसार हेअर स्प्रे वापरा

केसांसाठी ५ प्रकारचे होममेड हेअर स्प्रे! केसांची नेमकी समस्या ओळखा आणि त्यानुसार हेअर स्प्रे वापरा

Home Made Spray for Hair Problems: केसांची नेमकी काय समस्या आहे, हे ओळखून केसांसाठी घरच्याघरी कोणत्या प्रकारचा हेअर स्प्रे तयार करायचा, याविषयी ही खास माहिती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 05:57 PM2022-12-16T17:57:56+5:302022-12-16T17:58:37+5:30

Home Made Spray for Hair Problems: केसांची नेमकी काय समस्या आहे, हे ओळखून केसांसाठी घरच्याघरी कोणत्या प्रकारचा हेअर स्प्रे तयार करायचा, याविषयी ही खास माहिती.

5 Types of home made hair spray to solve each and every problem related to your hair | केसांसाठी ५ प्रकारचे होममेड हेअर स्प्रे! केसांची नेमकी समस्या ओळखा आणि त्यानुसार हेअर स्प्रे वापरा

केसांसाठी ५ प्रकारचे होममेड हेअर स्प्रे! केसांची नेमकी समस्या ओळखा आणि त्यानुसार हेअर स्प्रे वापरा

Highlightsयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेअर स्प्रे घरच्याघरी कसे तयार करायचे आणि केसांच्या कोणत्या समस्येसाठी त्याचा वापर करायचा, हे पाहूया.

केसांच्या वेगवेगळ्या समस्या सध्या अनेकांना भेडसावत आहेत. कुणाचे केस वाढतच (hair growth) नाहीत, कुणाचे केस खूपच ड्राय आहेत तर कुणाचे केस धुतल्यानंतर लगेचच तेलकट (oily hair) होतात... प्रत्येकाच्या केसांबाबत वेगवेगळ्या समस्या (dandruff, dry scalp) आहेत. आता आपल्या केसांची नेमकी समस्या ओळखून त्यासाठी कसा उपाय करायचा, याची ही खास माहिती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेअर स्प्रे (5 Types of home made hair spray) घरच्याघरी कसे तयार करायचे आणि केसांच्या कोणत्या समस्येसाठी त्याचा वापर करायचा, हे पाहूया.

१. केसांची वाढ होण्यासाठी...
केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी आवळ्याचा हेअर स्प्रे वापरून बघा. यासाठी ५ ते ६ आवळ्यांचा रस करून घ्या. त्यात १ टीस्पून खोबरेल तेल आणि रोजमेरी ऑईलचे २ थेंब टाका सगळं मिश्रण व्यवस्थित  एकत्र करून डोक्याच्या त्वचेला लावा. एखाद्या तासाने माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका.  

 

२. चिकट केसांसाठी..
२ टीस्पून कोरफडीचा गर, १ कप पाणी एका भांड्यात एकत्र करून उकळून घ्या. त्यात लॅव्हेंडर इसेंशियल ऑईलचे काही  थेंब टाका. सगळं मिश्रण एकत्र झालं की एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. केस धुतल्यानंतर अर्धवट सुकले की हा स्प्रे तुमच्या केसांवर मारा. केस सिल्की होतील.

 

३. तेलकट केसांसाठी..
एका भांड्यात १ कप पाणी, २ टीस्पून ॲपलसाईड व्हिनेगर, १ टीस्पून कोरफडीचा गर घेऊन व्यवस्थित एकत्र करून घ्या. हा स्प्रे तुमच्या स्काल्पला आणि केसांना लावा. त्वचेतून अतिरिक्त सेबम तयार होणं कमी होईल.  

अमेरिकन तरुणाने केला झणझणीत राजस्थानी मिरची वडा! पाहून तोंडाला पाणी सुटेल, बघा रेसिपी, व्हिडिओ व्हायरल

४. पातळ केसांसाठी
४ टेबलस्पून तांदूळ एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्यादिवशी ते पाणी गाळून घ्या आणि  डोक्याच्या त्वचेवर लावा. एखाद्या तासानंतर सल्फेट फ्री किंवा माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका.  

 

५. केस गळणं कमी करण्यासाठी
एक मध्यम आकाराचा कांदा मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घ्या. त्यात एक टीस्पून आवळ्याचं किंवा खोबऱ्याचं तेल टाका.

डाळिंब खाऊन सालं फेकून देऊ नका; डाळिंबाच्या सालींचे ८ जबरदस्त फायदे, अत्यंत आरोग्यदायी उपयोग

मिश्रण व्यवस्थित हलवून झालं की डोक्याच्या त्वचेला लावा. तासाभराने माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. 

 

Web Title: 5 Types of home made hair spray to solve each and every problem related to your hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.