भारतीय घरामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते. तुळशीपासून अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक फायदे देखील मिळतात. विशेष म्हणजे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळस अत्यंत फायदेशीर आहे. केसांचे चांगले आरोग्य आणि सौंदर्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो(How To Use Tulsi To Keep Hair Healthy).
तुळशीमध्ये आढळणारे औषधी गुणधर्म केसांना अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. त्याचवेळी, केस गळणे, कोंडा आणि कोरडे केसांपासून मुक्त होण्यासाठी याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. केसांसाठी तुळशीच्या पानांच्या पेस्टचा वापर (Tulsi Hair Mask for Long Thick Healthy Hair) अनेक प्रकारे केला जातो. तुळशीच्या पानांचा हेअर मास्क बनवून लावल्यास केसांशी संबंधित अनेक समस्यांवर त्याचा फायदा होतो. तुळशीमध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळून त्याची पेस्ट तयार करू शकता. केसांशी संबंधित समस्यांसाठी तुळशीचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया(5 Ways To Use Holy Basil For Hair).
केसांच्या आरोग्यासाठी तुळशीचा वापर कसा करावा ?
१. तुळस आणि दही :- जर तुम्हाला कोंड्याची समस्या असल्यास, तुम्ही तुळस आणि दही यांचा एकत्रित हेअर मास्क बनवून लावू शकता. या हेअर मास्कमुळे केस गळणे देखील थांबते आणि स्कॅल्पमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात २ टेबलस्पून तुळशीची पेस्ट घेऊन त्यात १ टेबलस्पून आवळा पावडर आणि थोडे आंबट दही घाला. त्याची पेस्ट बनवून केसांना लावा आणि ३० मिनिटे केसांना लावून ठेवा.
फेशियल ग्लो जास्त दिवस हवा तर करु नका या ८ चुका, नाहीतर ग्लो होईल गायब...
२. तुळस आणि मेथीची पेस्ट :- तुम्ही तुळस आणि मेथीच्या दाण्यांची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे थांबते. तुमचे केस पातळ होत असतील, तरीही तुम्ही हा हेअर मास्क लावू शकता. हेअर मास्क बनवण्यासाठी २ टेबलस्पून मेथीच्या बियांची पावडर घ्या. त्यात अर्धी वाटी तुळशीची पाने घाला आणि मेथीच्या दाण्याचे पाणी घालून मिक्स करा. त्याची पेस्ट बनवून केसांना लावा आणि ४५ मिनिटांनी केस धुवा.
३. तुळस आणि खोबरेल तेल :- जर तुमचे स्कॅल्प किंवा डोक्याची त्वचा कोरडी पडली असेल तर तुम्ही तुळस आणि खोबरेल तेलाचा हा मास्क लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात २ टेबलस्पू तुळशीची पावडर घ्या. त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून पेस्ट तयार करा. ३० मिनिटे केसांवर हा हेअर मास्क ठेवा. हा हेअर मास्क संपूर्णपणे वाळल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
४. तुळस आणि ब्लॅक टी :- केस काळे करण्यासाठी तुम्ही तुळस आणि ब्लॅक टीचा हेअर मास्क देखील लावू शकता. तुळशीची काही पाने पाण्यात उकळून त्याची पेस्ट बनवा. त्यात ४ टेबलस्पून ब्लॅक टी घाला. हे मिश्रण थोडे शिजवून थंड होण्यासाठी ठेवा. या पाण्याने केस धुवून घ्यावेत. केसांना नॅचरल काळा रंग येण्यास मदत होईल.
५. तुळस आणि एलोवेरा जेल :- तुम्ही तुळस आणि कोरफडीची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. जर तुमच्या डोक्यात खूप खाज येत असेल तर हा हेअर मास्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुळशीची पाने बारीक करून त्यात एलोवेरा जेल घालावे लागेल. हे मिश्रण स्कॅल्पवर लावावे आणि कोरडे झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...