डिसेंबर महिना म्हटलं की गुलाबी थंडी आणि लग्नाचा सिझन. या महिन्यांत सगळीकडे थंडीचे वातावरण असते यासोबतच या दिवसांत बरेच लग्नाचे मुहूर्त देखील असतात. यंदाच्या लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही होणाऱ्या वधू असाल किंवा जवळच्या मित्र - मैत्रिणी किंवा नातेवाईकांपैकी कुणाचे ना कुणाचे लग्न असतेच. याचबरोबर या लग्नात आपल्याला खास चारचौघींपेक्षा उठून दिसायचे असते. यासाठीच तर आपण लग्नाच्या महिनाभर आधी पार्लर, सलोनच्या अनेक फेऱ्या मारतो. एवढंच नव्हे तर लग्नात स्किन सुंदर दिसावी म्हणून अनेक महागड्या ट्रिटमेंट्स किंवा ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो( 5 superfoods that will nourish your skin this winter).
परंतु हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे आपली स्किन (5 Winter Special Desi Food Items for that Wedding glow) कोरडी पडून हळुहळु डल, निस्तेज दिसू लागते. अशावेळी, आपल्या स्किनसाठी अनेक घरगुती उपाय किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स करुन देखील काहीवेळा फायदा होत नाही. पण जर ऐन हिवाळ्यातही तुम्हाला लग्नसमारंभासाठी स्किन सुंदर, ग्लोइंग आणि मुलायम, चमकदार हवी असेल तर हिवाळ्यात मिळणारे सुपरफूड्स तुम्ही नक्की खाऊ शकता. कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट्स किंवा ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा हिवाळ्यात मिळणारे हे ५ सुपरफुड्स नक्की खा, आणि स्किनमध्ये दिसणारा फरक अनुभवा( 5 superfoods for glowing skin in winter For Wedding Season).
हिवाळ्यात मिळणारे नेमके कोणते पदार्थ खावेत ?
१. तूप :- हिवाळ्यात तूप खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. हिवाळ्यात रोजच्या आहारात तूप खाल्ल्याने पदार्थ चविष्ट होण्यासोबतच आपली त्वचादेखील मऊ, मुलायम होण्यास अधिक मदत मिळते. त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी हिवाळ्यात तूप खाणे आवश्यक आहे. तुपामध्ये व्हिटॅमिन 'ए', 'ई' आणि अँटीऑक्सिडंट्स फार मोठ्या प्रमाणांत असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहण्यास अधिक मदत मिळते. हिवाळ्यात रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तूप घेतल्यानेही त्याचा त्वचेलाअधिक फायदा होतो.
बाकी सगळं विसरा, हिवाळ्यात केसांना लावा दही-खोबरेल तेल; ‘हा’ पॅक करतो झाडूसारखे केस मऊ...
२. गाजर आणि बीट :- हिवाळ्यात मिळणारी लालचुटुक गाजर आणि बीट अवश्य खावे. या गाजर आणि बीटमध्ये असणारा त्यांचा नैसर्गिक लाल रंग तुमच्या त्वचेला अधिकच हेल्दी आणि ग्लोइंग बनवण्यास मदत करतो. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन असते आणि बीटरूटमध्ये लोह असते, ज्यामुळे त्वचेचा रक्तप्रवाह सुधारतो आणि आपल्या त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक येते. अनेकदा आपण गाजर खाताना त्याची वरची सालं काढून खातो परंतु खरतर गाजराच्या वरच्या सालीमध्येच बीटा-कॅरोटीन फार मोठ्या प्रमाणांत असते. त्यामुळे गाजर खाताना त्याची वरची सालं न काढता ते शक्यतो सालीसकटच खावे. गाजरासोबत बीट खाणे देखील तितकेच फायदेशीर ठरु शकते. यामुळे गाजर आणि बीटमध्ये असणारे फायबर आपल्या शरीराला मिळून त्याचे अनेक फायदे होतात.
३. गूळ आणि तीळ :- गूळ आणि तीळ हे दोन असे सुपरफूड आहेत जे हिवाळ्यात खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. गूळ शरीराला डिटॉक्स करतो आणि तीळ त्वचेला ओलावा देतो. हे पदार्थ त्वचेला आवश्यक फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम देतात. तिळाबद्दल बोलायचे झाले तर दुधाला कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो, तिळात दुधापेक्षा ८ पट जास्त कॅल्शियम असते. चहामध्ये गूळ घालून आणि तीळ आणि गुळाचे लाडू तयार करुन तुम्ही ते खाऊ शकता.
४. मुळा :- हिवाळ्यात मिळणारा पांढराशुभ्र मुळा देखील एक सुपरफूड आहे. मुळा हा फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पाण्याचा चांगला स्रोत आहे, जो त्वचेला डिटॉक्सिफाय आणि हायड्रेट करण्यास मदत करतो. मुळ्यामधील हाय फायबर तुमचे पचन चांगले ठेवते यामुळे तुमच्या पचनक्रियेचे आरोग्य सुधारते. चांगल्या पचनक्रियेचा थेट संबंध तुमच्या त्वचेशी असतो. हिवाळ्यात तुम्ही दही किंवा चटणीसोबत गरमागरम मुळ्याचा पराठा खाऊ शकता.
५. संत्री :- हिवाळ्यात मिळणारी संत्री ही व्हिटॅमिन 'सी' चे उत्तम स्रोत आहेत. व्हिटॅमिन 'सी' तुमच्या त्वचेची लवचिकता आणि चमक यासाठी खूप उपयुक्त आहे. संत्र्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते. हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. याचबरोबर त्वचेवर नैसर्गिक गुलाबी चमक येण्यासाठी व्हिटॅमिन 'सी' आवश्यक असते, त्यामुळे हिवाळ्यात संत्र खाणे फायदेशीर ठरेल.