दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. दिवाळीत येणाऱ्या प्रत्येक सणाचे असे एक विशेष महत्व असते. दिवाळी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येत ते रोषणाई, दिवे, रांगोळी, फराळ, अभ्यंगस्नान आणि बरंच काही. दिवाळी जवळ आली की आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे संपूर्ण अंगाला तेल लावणे आणि मग उटणे ( 6 Amazing Beauty Benefits Of Ubtan) लावून केलेली मस्त कडक पाण्याची आंघोळ. दिवाळीतील अभ्यंगस्नानाला एक प्रकारचे पारंपरिक महत्व लाभले आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या अभ्यंगस्नानाला पहिली आंघोळ असे देखील म्हटले जाते. अभ्यंगस्नान हे सुगंधी तेल व उटण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही(6 unknown benefits of using ubtan for skin).
अभ्यंगस्नानातील सुगंधी उटणं (Diwali Special Sugandhi Utane) हे आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून उटण्याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. उटणं हे जगातील सौंदर्यप्रसाधनाचा सर्वात जुना आणि सर्वात शुद्ध प्रकार आहे. उटणं (Ubtan - Indian Home Remedy for a Glowing, Radiant Skin) हे अत्यंत गुणकारी औषधी वनस्पतींपासून तयार केलं जाते. या बहुगुणी उटण्याच्या वापराने आपल्या त्वचेच्या सौंदर्यात अधिक भर पडते. त्वचेसाठी उटणं वापरण्यासोबतच त्याचे अनेकही फायदे आहेत. उटणं वापरण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहूयात(6 Awesome Benefits of Ubtan for Glowing and Soft Skin).
उटणं वापरण्याचे आहेत अनेक फायदे...
१. त्वचा स्वच्छ करण्यासाठी :- उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब उटण्यात मिसळणे फायदेशीर ठरते.
२. त्वचेवर चमक आणण्यासाठी :- उटण्यामध्ये वापरले जाणारे बेसन हे त्वचेवरील डेड स्किन घालवून आपल्याला उत्तम त्वचा मिळवून देण्यास अधिक फायदेशीर ठरते. उटण्यामध्ये चंदन पावडर मिक्स केल्यास, त्वचेवरील अधिक तेल निघून जाण्यास मदत मिळते. दुधाने त्वचेवरील काळे डाग कमी होतात आणि त्यामळे त्वचेवर अधिक चमक आणण्यासाठी उटण्याचा उपयोग होतो. म्हणूनच त्वचेवरील चमक कायम ठेवायची असेल तर नियमितपणे उटण्याचा वापर करायला हवा.
अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...
३. अनावश्यक केस काढण्यासाठी :- उटण्यामुळे आपल्या शरीरावरील अनावश्यक असलेले केस काढून टाकण्यास मदत मिळते. उटणे हा शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी अत्यंत सौम्य, नैसर्गिक आणि सुरक्षित सोपा असा पर्याय आहे. या उटण्याने शरीरावरील आवश्यक केस अतिशय सहज सोप्या पद्धतीने काढता येऊ शकतात.
४. त्वचा कोरडी होण्यापासून बचाव करते :- उटण्यामध्ये असणाऱ्या चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. दिवाळी हा थंडीच्या दिवसांत येणारा सण. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे त्वचेची आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास सुरुवात होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. त्यामुळे दिवाळी शिवायही एरवी आणि विशेषतः थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर जरुर करावा.
सुगंधी - शाही उटणं घरच्याघरी करण्याची घ्या सोपी कृती, बाजारातलं उटणं विसराल इतके सुंदर...
५. एजिंगच्या खुणा होतात नाहीशा :- वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. उटण्यात असणाऱ्या हळदीमध्ये अॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा अधिक फायदा होतो. उटण्यात मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
६. उत्तम स्क्रबर म्हणून वापर :- उटण हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत करते. तर बेसन त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. चंदनामुळे त्वचेत थंडावा व ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तर यामध्ये दूध मिसळल्यास त्वचा चमकदार बनते. उटणं हे एक उत्तमप्रकारचे स्क्रबर आहे. बाजारातून विकतची स्क्रबर्स आणून ती लावण्यापेक्षा उटणं वापरणं हे अतिशय फायदेशीर ठरेल.