जगभरातील लोक आपले सौंदर्य टिकवण्यासाठी आणि म्हातारपण चेहऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. त्याच वेळी, काही लोक त्या घरगुती पद्धतींचा अवलंब करण्यावर विश्वास ठेवतात (6 Best Anti Aging Skin Care Tips) या सर्व गोष्टी प्रत्येकासाठी प्रभावी ठरल्या पाहिजेत, असे अजिबात नाही. वृद्धत्वाची चिंता करणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल आणि तुमची त्वचा तरूण ठेवू इच्छित असाल तर डॉक्टरांनी सांगितलेले काही उपाय यामध्ये मदत करू शकतात.(How to reverse and control signs of ageing methods told by doctor rashmi shetty)
प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रश्मी शेट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की त्वचेवरील वृद्धत्वाच्या लक्षणांना दूर ठेवण्यासाठी 6 मार्ग कसे उपयुक्त ठरू शकतात आणि यासाठी तुम्हाला बोटॉक्स करण्याची गरजही पडणार नाही. (Anti Aging Skin Care Tips)
लाईफस्टाईल चेंज
डॉ. रश्मी यांनी व्हिडिओसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला माहित आहे की हे अनेकदा सांगितले गेले आहे, परंतु हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. फक्त पुरेशी झोप घेणे, शरीराला योग्य पौष्टिक आहार देणे आणि व्यायाम केल्याने वृध्दत्वाच्या खुणा टाळण्यास मदत होते आणि स्वतःला निरोगी ठेवता येते.
स्किन केअर
त्वचारोगतज्ज्ञ स्किन केअरवर भर देतात. “जेव्हा अँटी-एजिंगचा विचार केला जातो तेव्हा त्वचेची काळजी घेण्याच्या काही पद्धतींकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही. नेहमी सनस्क्रीन लावणे, मॉइश्चरायझर लावणे, सीरमच्या वापराने त्वचेला हायड्रेट ठेवणे आणि रेटिनॉल सारख्या अँटीऑक्सिडंट क्रीम्सचा वापर करणे या उपायांमुळे वृद्धत्वाच्या खुणा टाळण्यास मदत होते.
न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स
त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ बाह्यच नाही तर अंतर्गत काळजी देखील आवश्यक आहे. डॉ. रश्मी यांच्या म्हणण्यानुसार पौष्टिक आहाराद्वारे त्वचा संरक्षित आणि हायड्रेट ठेवता येते. त्वचा जर आतून निरोगी असेल तर ती बाहेरून तरूण दिसेल.
फेशियल
लोक साधारणपणे फेशियलबद्दल चिंताग्रस्त असतात, परंतु रश्मी शेट्टीच्या मते, डॉक्टर काही मूलभूत फेशियल टाईप्स सुचवू शकतात, जे त्वचेतील पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स वाढवतात. यामुळे त्वचा तरूण तर होतेच, पण ती निरोगी आणि हायड्रेटही राहते.
एनर्जी बेस्ड डिव्हाईसेस
त्वचेच्या स्थितीनुसार त्यांना कोणत्या प्रकारचे उपकरण वापरावे लागेल याबद्दल प्रथम डॉक्टर आणि व्यक्ती यांच्यात चर्चा होते, त्यावर आधारित ऊर्जा-आधारित उपकरणे नंतर वापरली जातात.
इंजेक्टेबल्स
डॉ.शेट्टी म्हणाल्या की, इंजेक्टेबल्सला घाबरण्याची गरज नाही. ही प्रक्रियाही भीतीदायक नाही. बोटॉक्स हीच केवळ वृद्धत्वविरोधी इंजेक्शनचा उपाय नाही तर प्रोफिलो, मेसो, पीआरपी, फिलर्स असे अनेक पर्याय आहेत. हे निरोगी आणि तरुण त्वचा देण्यास मदत करते.