Join us  

वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं तर आहारात घ्या ६ पदार्थ, वय वाढलं तरी त्वचा राहील सतेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 5:58 PM

6 easy Diet Tips to look young even you are aging : एकदा वयाची तिशी ओलांडली की वाढलेले हे वय चेहऱ्यावर दिसते

तारुण्याचा काळ हा अतिशय स्वप्नवत असतो तो कायम सोबत असावा अशी आपली इच्छा असते.  म्हणूनच आपलं वय कितीही वाढलं तरी आपण कायम तरुण दिसावे असे बहुतांश स्त्रियांना वाटते. तारुण्यात आपली त्वचा तुकतुकीत आणि तेजस्वी असते. पण जसे वय होत जाते तसे त्वचेचे हे तेज कमी होते आणि चेहरा निस्तेज आणि सुरकुतल्यासारखा दिसायला लागतो. एकदा वयाची तिशी ओलांडली की वाढलेले हे वय चेहऱ्यावर दिसते आणि मग आपल्यालाही वय वाढल्याची जाणीव व्हायला लागते (6 easy Diet Tips to look young even you are aging).

 चेहरा वयस्कर दिसू नये यासाठी आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस घेतो. पण त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. इतकेच नाही तर यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सचा चेहऱ्यावर विपरीत परीणाम होतो. अनेकदा चेहरा तरुण दिसावा यासाठी आपण काही घरगुती उपायही करतो. पण त्यासोबतच आहारातूनही काही घटक पोटात गेले तर त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते. यासाठी आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी आहारतज्ज्ञ रमिता कौर काही खास पदार्थांची यादी देतात. ते कोणते आणि कधी कसे खायचे याविषयी...

(Image : Google)

१. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी १ लसणाची पाकळी ठेचून खायला हवी.

२. न चुकता रोज १ ग्लास ताक १ चमचा भाजलेले जवस घालून प्या. नाश्ता आणि जेवण यांच्या मध्यल्या वेळात म्हणजे साधारण ११ वाजताच्या दरम्यान हे घ्यायला हवे. 

३. आंबवलेली इडली, डोसा यांचा आहारात समावेश करा. त्यामध्ये सिझनल भाज्या आवर्जून घाला. 

४. संध्याकाळी ४ किंवा ५ च्या दरम्यान भूक लागल्यावर केळं, सफरचंद, पपई यांपैकी एक फळ १ ग्लास चिया सीडस पाण्यासोबत खा. 

५. घरी तयार केलेले लोणचे न चुकता रात्रीच्या जेवणात थोड्या प्रमाणात का होईना घ्यायलाच हवे. 

६. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर बडीशेपचा चहा आवर्जून घ्या. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल. 

याशिवाय भरपूर पाणी पिणे, ताणविरहीत जीवन जगणे आणि दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सआहार योजनात्वचेची काळजी