आपला चेहरा अभिनेत्रींप्रमाणे नितळ आणि चमकदार असावा असे प्रत्येकीला वाटते. मेकअप न करताही आपली स्कीन ग्लो व्हावी अशी आपली इच्छा असते. मात्र हे असे एकाएकी होत नाही. तर त्यासाठी आपला आहार, व्यायाम, त्वचेची काळजी या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. तसेच आपल्या विचारांचा आणि मानसिक अवस्थेचाही त्वचेवर आणि एकूणच आरोग्यावर परीणाम होत असतो. मात्र आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास त्वचा नितळ राहण्यास मदत होते. अभिनेत्री व्यायाम, आहार या गोष्टींकडे कायमच विशेष लक्ष देत असतात. म्हणूनच त्यांच्या त्वचेवर एकप्रकारचा ग्लो दिसून येतो. उत्तम आरोग्यासाठी आणि सुंदर त्वचेसाठी आहारात काय काय घ्यायला हवे याविषयी समजून घेऊया (6 Foods Can help to Get Glowing Skin)…
१. पाणी
त्वचा नितळ आणि सुंदर हवी तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्यायला हवे.. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा साफ होण्यास मदत होते तसेच साधे पाणी पिण्याचा वारंवार कंटाळा येत असेल तर सध्या बाजारात विविध प्रकारचे पाणी उपलब्ध आहे ते पिऊन पाहायचे.
२. फळं आणि भाज्या
फळं आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला आणि त्वचेला पौष्टीक बनवायचे असेल तर विविध रंगांची, चवीची फळं आणि भाज्या खायला हव्यात.
३. मोड आलेली धान्ये आणि कडधान्ये
मोड आलेल्या धान्यांतून आणि कडधान्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात पोषण मिळते. मोड आलेली मूग डाळ, मेथी, हरभरा यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असतात. याबरोबरच त्वचेच्या पेशी निर्मितीसाठीही याचा चांगला उपयोग होतो.
४. तृणधान्ये खायला हवीत
गव्हापासून तयार केलेली पोळी, ब्राऊन राईस, ओटस, बाजरी, नाचणी यांसारख्या तृणधान्यांचा आहारात समावेश करायला हवा. फायबरयुक्त आहार घेतल्याने त्वचेला त्यापासून चांगले पोषण मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास याचा चांगला उपयोग होतो.
५. प्रोबायोटीक्स
दही, ताक, किमची यांमध्ये प्रोबायोटीक्स असतात. शरीरातील चांगल्या बॅक्टेरीयांची संख्या वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्वचा मुलायम आणि ग्लोईंग राहावी यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
६. चहा,कॉफी ऐवजी ग्रीन टी घ्या
कॉफीपेक्षा ग्रीन टी घेणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. त्वचेला विवि संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.