उन्हाळ्यात तीव्र उन्हासोबतच गरम हवा, घाम, प्रदूषण यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. उन्हात थोडा वेळ जरी घराबाहेर पडलं तरी त्वचेची आग आग होते. उन्हाचा वाढता तडाखा बघता त्वचेची काळजी न घेता बाहेर पडणं सौंदर्यास आणि त्वचेस हानिकारक ठरतं. उन्हाळ्यात त्वचेला सनबर्नच सर्वात जास्त धोका असतो. सनबर्नमुळे चेहरा टॅन होतो, काळपट पडतो. त्वचा सूजते. सूर्याच्या हानिकारक किरणांच्या संपर्कात आल्यानं सनबर्नचा त्रास होतो. त्यामुळेच त्वचेला सूर्याच्या अति नील किरणांपासून आवश्यक ठरतं.
Image: Google
उन्हाळ्याच्या दिवसात 10 मिनिटांपेक्षा अधिक काळ उन्हात राहिल्यास सनबर्न होण्याची प्रक्रिया सुरु होते. सनबर्नमुळे त्वचेवर लालसर पुरळ, चट्टे पडतात. त्वचेचा रंग काळपट पडतो. त्वचेतला ओलावा निघून जाऊन त्वचा सुकते आकसते. सनबर्नमुळे त्वचेचा पोत खराब होतो. स्किन एजिंगच धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण करणं, घरातून बाहेर पडताना, उन्हातून घरात आल्यावर त्वचेची योग्य काळजी घेणं महत्वाचं आहे. सनबर्नसाठी घरच्याघरी प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.
Image: Google
1. माॅश्चरायझर हे फक्त हिवाळ्यातच गरजेचं असतं असं नाही. उन्हाळ्यातही त्वचेत पुरेसा ओलसरपणा असणं आवश्यक असतं त्यासाठी आंघोळीनंतर लगेचंच माॅश्चरायझर लावणं आवश्यक असतं. माॅश्चरायझर लावल्यानं उन्हानं त्वचा शुष्क होत नाही. आकसत नाही आणि सनबर्नमुळे होणारा एजिंगचा धोकाही टाळता येतो.
Image: Google
2. हिवाळ्यात आणि पावसाळ्यातही बाहेर पडताना सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं. तसं उन्हाळ्यात सनस्क्रीन क्रीम लावणं अत्यावश्यक असतं. सनस्क्रीन क्रीम लावण्याशिवाय बाहेर पडल्यास सनबर्न होतोच. यासाठी बाहेर पडण्याआधी चांगल्या एसपीएफचं सनस्क्रीन लावावं. सनस्क्रीन घेताना त्यात ॲण्टिऑक्सिडण्ट, अ आणि क जीवनसत्व असणं आवश्यक असतं.
Image: Google
3. सनबर्नपासून त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी ड जीवनसत्वयुक्त क्रीम वापरावी. ड जीवनसत्वानं सूर्याच्या अति नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. यामुळे त्वचेवर चमकही येते. उन्हाळ्यात त्वचेवर चमक ही तशी अशक्यप्राय वाटणारी बाब ड जीवनसत्वयुक्त क्रीमच्या वापरानं शक्य होते.
Image: Google
4. सनबर्नचा धोका टाळण्यासाठी बाहेर जाताना सनकोट आणि चेहऱ्याभोवती रुमाल. ओढणी/ स्कार्फ लपेटणं आवश्यक असतं. उन्हाच्या झळा आणि गरम वाफांपासून त्वचेचं संरक्षण होतं.
Image: Google
5. उन्हाळ्यात बाहेर पडताना त्वचेची काळजी घेणं जेवढी गरजेची तितकंच बाहेरुन आल्यावर उपाय करणंही आवश्यक असतं. बाहेरुन आल्यवर सुती रुमालात बर्फाचा तुकडा घेऊन तो चेहेऱ्यावरुन हळूवार फिरवावा. चेहऱ्यास बर्फाचा मसाज केल्यानं उन्हानं त्वचेची होणारी आग थांबते.
Image: Google
6.. बाहेरुन आल्यानंतर पाच मिनिटांनी चेहरा थंडं पाण्यानं धुवून चेहऱ्याला टोनर लावावं. चेहरा धुवून नंतर बर्फानं थोडा वेळ शेकून टोनर लावलं तरी चालतं.