Join us  

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणणारे ६ घरगुती उपाय. महागड्या क्रीमचीही गरज नाही, चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 9:12 AM

Beauty Tips For Natural Glow: हे उपाय जर नियमितपणे केले तर तुम्हाला त्वचेसाठी कोणतंही महागडं क्रीम वापरण्याची गरज राहणार नाही.

ठळक मुद्देतुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये हे काही उपाय सामाविष्ट करून बघा.

कधी कधी आपण आपल्या त्वचेची खूपच जास्त काळजी करतो (skin care routine). पण ती नेमकी चुकीच्या दिशेने. म्हणजेच असे की त्वचेची काळजी घ्यायची म्हणून चेहऱ्यावर आपण केमिकल युक्त कॉस्मेटिकचा खूपच भडीमार करतो. पण त्याचा बऱ्याचदा उलटा परिणाम दिसून येतो आणि त्वचेचे नुकसान होते (How to glow naturally). असे होऊ नये म्हणून आता हे काही घरगुती उपाय करून बघा. किंवा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये हे काही उपाय सामाविष्ट करून बघा. या नैसर्गिक उपायांमुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसू लागेल आणि मग चेहऱ्यावर इतर काही महागडे कॉस्मेटिक लावण्याची गरज उरणार नाही (Home remedies for radiant, glowing and young skin).

 

त्वचा चमकदार होण्यासाठी ६ नैसर्गिक उपाय१. यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे त्वचा नेहमी हायड्रेटेड ठेवा. याचाच अर्थ असा की रोज भरपूर पाणी प्या. तसेच आहारात फळे, ज्यूस यांचा समावेश वाढवा. यामुळे त्वचेचे पोषण होते आणि त्वचा कोरडी पडत नाही

२. दुसरा उपाय म्हणजे आहारावर लक्ष द्या. रोज सकस आहार घेतल्यास त्याचा चांगला परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोषणमुल्ये आपल्या आहारात असतील, याकडे लक्ष द्या.

निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

३. तिसरा उपाय म्हणजे रोजचे स्किन केअर रुटीन सांभाळा. यामध्ये क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या स्टेप्स करायला विसरू नका. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन मॉइश्चराईज करून मगच झोपा. चेहऱ्यावर मेकअप ठेवून झोपू नका.

 

४. चौथी स्टेप म्हणजे त्वचेवरची डेड स्किन वारंवार काढून टाका. यासाठी घरगुती नैसर्गिक स्क्रबचा वापर केला तर अधिक उत्तम.

५. उन्हामध्ये जाताना त्वचेची पुरेशी काळजी घ्या. उन्हात जाण्यापुर्वी त्वचेवर सनस्क्रिन लावायला तसेच चेहरा पूर्णपणे झाकून घ्यायला विसरू नका. 

अंकिता लोखंडे पुन्हा चढली बोहल्यावर, नेसली सुंदर गुलाबी सिक्विन साडी! सिक्विन साडीचा पाहा नवा ट्रेण्ड

६. शरीराला फिट राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते, तशीच आपल्या चेहऱ्यालाही असते. चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस टिकून राहण्यासाठी नियमितपणे फेशियल मसार करा. तसेच चेहऱ्याचे काही व्यायामही करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी