Join us  

चेहरा गोरा दिसावा म्हणून ब्लिच करताय, पण लक्षात ठेवा ६ गोष्टी, नाहीतर व्हायची गडबड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2023 7:47 PM

All You Need To Know About Face Bleach : चेहेऱ्यावर ब्लिच करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं.

आपण सुंदर दिसावं, आपली त्वचा सुंदर, नितळ, गोरी असावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. यासाठी स्त्रिया दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स करुन घेतात. साधारणतः स्त्रिया दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन आयब्रो, फेशियल, किंवा वॅक्सिंग, ब्लिचिंग अशा काही बेसिक ट्रिटमेंट्स करुन घेतात. त्वचा उजळण्यासाठी, टॅनिंग काढण्यासाठी आणि चेहऱ्यावरील केस लपवण्यासाठी त्वचेवर ब्लिचिंग केले जाते. एखाद्या पार्टीला किंवा लग्नाला जायचं असेल आणि कमी वेळ असल्यास चेहऱ्यावरील ग्लोसाठी आणि बारीक केस झटपट लपवण्यासाठी ब्लिचिंग हा एक झटपट उपाय आहे. ब्लिचमुळे आपली त्वचा मऊ बनवण्यासोबतच तिचं पोषणही केलं जात. 

ब्लिचच योग्य प्रमाण आणि योग्य वेळ ठेवल्यास चेहरा सुंदर दिसण्यासाठी उपयुक्त ठरत. ब्लिच करण्यासाठी पार्लरलाच जायला हवं असं काही गरजेचे नसते.  ब्लिच करणं जितकं सोपं आहे तितकेच त्याचे दुष्परिणामही आहेत. सोपं असल्याने घरच्या घरी ब्लिच करण्याला काहीजणी सहसा प्राधान्य देतात. ब्लिच करताना तीव्र वास आणि सौम्य जळजळ होत असूनही, काहीजणी नियमितपणे ब्लिच करतात. परंतु चेहेऱ्यावर ब्लिच करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे खूपच महत्वाचे असते(6 Things You Must Know Before Bleaching Your Face).

१. ब्लिचिंग करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

१. ब्लिच करण्यापूर्वी नेहमी तुमच्या हाताच्या कोणत्याही भागावर पॅच टेस्ट करा. यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिअ‍ॅक्शन तर येत नाही, म्हणजे ब्लीचमुळे पुरळ किंवा ऍलर्जी होत नाही. पॅच टेस्ट केल्यानंतर, कमीतकमी ४८ तास त्वचेचे निरीक्षण करा, जर कोणतीही रिअ‍ॅक्शन नसेल तर फक्त चेहऱ्यावर ब्लिच करा.

२. ब्लिचिंग करण्यापूर्वी चेहऱ्याची त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. मेकअप पूर्णपणे काढून टाका आणि थंड पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवून घ्या.  लक्षात ठेवा, ब्लीच करण्यापूर्वी चेहऱ्यावर गरम किंवा कोमट पाणी वापरू नका, यामुळे छिद्रे उघडतील आणि फुटू शकतात.

३. ब्रश किंवा स्पॅटुला वापरून तुमच्या चेहऱ्यावर हळूवारपणे ब्लीच लावा. ते चोळू नका नाहीतर पुरळ उठू शकते.

चेहरा कायम भप्प सुजलेला दिसतो, थोराड दिसतो? ५ सोप्या टिप्स, चेहरा दिसेल रेखीव सुंदर...

४. चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा कोणतीही जखम असल्यास ते बरे होण्याची प्रतीक्षा करा, त्यानंतरच चेहऱ्यावर ब्लिचिंग करावे.  

५. फेशियल केल्यावर कधीही ब्लिच करू नका, त्यामुळे ब्लिचचा प्रभाव दिसून येणार नाही आणि चेहऱ्यावर चमकही येणार नाही.

६. ब्लिच पॅकवरील सूचनांचे अनुसरण करा. पॅकवर नमूद केलेल्या वेळेपुरताच ब्लिच त्वचेवर ठेवावे आणि त्याच प्रमाणात वापर करावा. 

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

२. ब्लिचिंग केल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

१. ब्लिचिंगनंतर किमान ६ ते ७ तास तुमच्या त्वचेवर साबण-आधारित उत्पादने वापरू नका.२. ब्लिचिंगनंतर किमान ५ ते ६ तास उन्हात जाऊ नका. यासाठी ब्लिच करण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळ किंवा रात्र.

३. ब्लिच केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर मेकअप करण्यापासून दूर राहा.४.ब्लिचिंगनंतर अल्कोहोल-आधारित उत्पादने वापरल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी