घरात काही खास प्रसंग असला किंवा सध्याच्या सणावाराच्या खास क्षणी प्रत्येकीला आपण सुंदर दिसावे असे वाटते. यामुळेच आपण लगबगीने पार्लरमध्ये जाऊन फेशियल, ब्लिच किंवा साधे क्लिनअप तर नक्कीच करुन घेतो. चेहऱ्यावर इस्टंट ग्लो येण्यासाठी आणि चेहऱ्यावरील बारीक केस लपवण्यासाठी अनेकींना ब्लिचमुळे मदत होते. रोजच्या घाई गडबडीत आपल्याला स्किनकडे विशेष लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत, कमी वेळात चेहऱ्यावरील ग्लोसाठी व बारीक केस झटपट लपवण्यासाठीचा ब्लिच हा एक झटपट उपाय आहे(6 things you must know before bleaching your face).
ब्लिचमुळे आपली त्वचा मऊ व तजेलदार तर होतेच सोबतच तिचं पोषणही केलं जात. ब्लिच योग्य प्रमाणांत आणि योग्य वेळी केल्यास ते चांगला रिझल्ट देतं. ब्लिचला ब्लीचिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. जे एक प्रकारचं केमिकल असतं. याचा वापर हा मुख्यतः चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका करण्यासाठी, त्वचा स्वच्छ आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी केला जातो. या पूर्ण प्रोसेसला ब्लीचिंग (Bleach- An Easy Guide For Application And Aftercare) असं म्हटलं जातं. ब्लिच करण्यासाठी पार्लरलाच जायला हवं असं काही गरजेचे नसते. ब्लिच करणं जितकं सोपं आहे (Do's and Don’ts To Keep In Mind Before Bleaching Your Face) तितकेच त्याचे दुष्परिणामही आहेत. सोपं असल्याने घरच्या घरी ब्लिच करण्याला काहीजणी सहसा प्राधान्य देतात. ब्लिच करताना तीव्र वास आणि सौम्य जळजळ होत असूनही, काहीजणी नियमितपणे ब्लिच करतात. परंतु चेहेऱ्यावर ब्लिच करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे खूपच महत्वाचे असते(6 Things You Must Know Before Bleaching Your Face).
१. ब्लिचिंग करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
१. ब्लिच करण्यापूर्वी नेहमी तुमच्या हाताच्या कोणत्याही भागावर पॅच टेस्ट करा. यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिअॅक्शन तर येत नाही, म्हणजे ब्लीचमुळे पुरळ किंवा ऍलर्जी होत नाही. पॅच टेस्ट केल्यानंतर, कमीतकमी ४८ तास त्वचेचे निरीक्षण करा, जर कोणतीही रिअॅक्शन नसेल तर फक्त चेहऱ्यावर ब्लिच करा.
२. ब्लिचिंग करण्यापूर्वी चेहऱ्याची त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. मेकअप पूर्णपणे काढून टाका आणि थंड पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवून घ्या. लक्षात ठेवा, ब्लीच करण्यापूर्वी चेहऱ्यावर गरम किंवा कोमट पाणी वापरू नका, यामुळे छिद्रे उघडतील आणि फुटू शकतात.
३. ब्रश किंवा स्पॅटुला वापरून तुमच्या चेहऱ्यावर हळूवारपणे ब्लीच लावा. ते चोळू नका नाहीतर पुरळ उठू शकते.
मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...
BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...
४. चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा कोणतीही जखम असल्यास ते बरे होण्याची प्रतीक्षा करा, त्यानंतरच चेहऱ्यावर ब्लिचिंग करावे.
५. फेशियल केल्यावर कधीही ब्लिच करू नका, त्यामुळे ब्लिचचा प्रभाव दिसून येणार नाही आणि चेहऱ्यावर चमकही येणार नाही.
६. ब्लिच पॅकवरील सूचनांचे अनुसरण करा. पॅकवर नमूद केलेल्या वेळेपुरताच ब्लिच त्वचेवर ठेवावे आणि त्याच प्रमाणात वापर करावा.
आंघोळीच्या पाण्यांत घाला या पदार्थाचे ३ ते ४ जादुई थेंब, त्वचेत दिसेल इतका सुंदर फरक की...
फेशियलनंतर वाफ घेताना हमखास होणाऱ्या ४ चुका, फेशियल करूनही हमखास लागते चेहऱ्याची वाट...
२. ब्लिचिंग केल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
१. ब्लिचिंगनंतर किमान ६ ते ७ तास तुमच्या त्वचेवर साबण-आधारित उत्पादने वापरू नका.२. ब्लिचिंगनंतर किमान ५ ते ६ तास उन्हात जाऊ नका. यासाठी ब्लिच करण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळ किंवा रात्र. ३. ब्लिच केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर मेकअप करण्यापासून दूर राहा.४.ब्लिचिंगनंतर अल्कोहोल-आधारित उत्पादने वापरल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते.