केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्वपूर्ण घटक आहे. घनदाट, लांबसडक, काळ्याभोर केसांमुळे आपल्या सौंदर्यात अधिक भर पडली जाते. आपल्यापैकी काहीजणांचे केस हे कमी वयातच पांढरे होतात. कोणालाही आपले केस पांढरे झालेले नको असतात. आपल्यापैकी प्रत्येकजण डोक्यावरील पांढरे केस लपविण्याचा प्रयत्न करत असतात. असे पांढरे केस लपवण्यासाठी आपण केसांना मेहेंदी, डाय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम रंग लावतो. काहीवेळा तर आपण केस काळे करून घेण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन मोठ्या महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतो.
केसांना कलर करणे हे केवळ महागच नाही तर केसांची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. कधीकधी खराब दर्जाचे केसांचे रंग केसांना निर्जीव, निस्तेज बनवतात. काही लोक स्वतःहून केसांना कलर करायला सुरुवात करतात, पण घरी केस कलर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आजकाल केसांना कलर करण्याचा ट्रेंडच आला आहे. ज्यांचे केस पांढरे आहेत किंवा नाही, ते वेगवेगळ्या शेड्स देऊन केसांना नवा लूक द्यायचे ट्राय करतात. यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यात भरपूर केमिकल्स असतात. त्यामुळे अनेकवेळा आपले केस खराब होतात. काही केसांचे रंग इतके कठोर असतात की त्यामुळे स्कॅल्पचे देखील नुकसान होऊ शकते. त्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन गळू लागतात. जर आपल्याला या सर्व समस्या टाळायच्या असतील तर केसांना कलर (hair colour) करताना काही गोष्टी लक्षात ठेवा(6 Things You Need to Know Before Coloring Your Hair At Home).
घरच्या घरी केसांना हेअर कलर करताना कोणती काळजी घ्यावी...
१. सर्वप्रथम पॅच टेस्ट करा :- आपण आपल्या केसांसाठी पहिल्यांदाच केमिकलयुक्त डाय किंवा कृत्रिम हेअर कलर वापरत असाल तर केसांच्या छोट्या भागावर सर्वप्रथम त्याची पॅच टेस्ट करून घ्यावी. हेअर कलर लावल्यावर जर आपल्याला खाज सुटणे, डोळ्यांची जळजळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशा काही समस्या उद्भवल्या तर हेअर डाय किंवा हेअर कलर अजिबात वापरू नका. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पॅच टेस्ट करण्यासाठी एका भांड्यात थोड्या प्रमाणात रंग मिसळा. हे मिश्रण थोडेसे घ्या आणि ते आपल्या कानामागील त्वचेवर किंवा मनगटावर लावा. यानंतर, आपल्याला काही ऍलर्जी आहे की नाही हे किमान २४ तासांसाठी पडताळून पहा.
महागडे तेल-शाम्पू -केमिकल्सचा मारा टाळा, जावेद हबीब सांगतात सुंदर केसांसाठी ५ नॅचरल उपाय...
२. पॅकेजिंग बॉक्सवरील सूचना नीट वाचा :- केसांचा कोणताही रंग आपण बाजारातून खरेदी कराल तेव्हा, त्यावर लिहिलेल्या सूचना एकदा नीट वाचा. यासाठी ते हेअर कलरचे पाकीट किंवा बॉक्स यावरील सूचना वाचल्याशिवाय फेकू नका. पॅकेटवरील सूचना नीट वाचून घरी केसांना रंग लावला तर केसांना फारसे नुकसान होणार नाही आणि केसांना रंगही व्यवस्थित पद्धतीने लावून होईल.
२ चमचे आवळा पावडर- २ चमचे शिकेकाई पावडर, लावा हा हेअरपॅक - केस चटकन होतील काळे...
३. अमोनियायुक्त हेअर कलर वापरणे टाळा :- जर आपण घरीच हेअर कलर करणार असाल तर केसांसाठी अमोनिया नसलेले हेअर कलर वापरणे हा सर्वात उत्तम पर्याय राहील. यामुळे हेअर कलरचा येणारा रासायनिक वास, डोळ्यांत होणारी जळजळ टाळता येईल आणि केसांना इजा होणार नाही.
केस गळतीची समस्या कायमची संपवायची ? करा कढीपत्त्याच्या एक परफेक्ट उपाय...
४. स्कॅल्पला रंग लावणे टाळा :- केसांना कोणताही केमिकल्सयुक्त रंग लावण्यापूर्वी संपूर्ण स्कॅल्पची व्यवस्थित काळजी घ्या. शक्यतो स्कॅल्पला रंग लावणे टाळावे. यामुळे आपल्या स्कॅल्पमध्ये केमिकल शोषले जाण्याचा धोका कमी होईल. जर रंग आपल्या स्कॅल्पमध्ये शोषला गेला आणि रक्तप्रवाहात मिसळला गेला तर आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. केसांना डाय किंवा हेअर कलर केल्यानंतर स्कॅल्प स्वच्छ धुतले जाईल याची काळजी घ्यावी.
आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...
५. केस रंगवण्याआधी ते धुवू नका :- जर आपल्याला केस घरच्या घरीच रंगवायचे असतील तर एक किंवा दोन दिवस आधी केसांना शॅम्पू करणे टाळा. जेव्हा आपण केसांना शॅम्पू करून धूत नाही, तेव्हा केसांमध्ये असलेले सेबम आणि नैसर्गिक तेल टाळूवर संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतात. यामुळे केस आणि टाळूला कोणतीही हानी पोहोचत नाही. टाळूवर खाज, जळजळ होत नाही. केसांवरही रंग चांगला चढतो.
६. हेअर ट्रिटमेंट्स केलेल्या केसांवर रंग लावू नये :- जर आपण नुकतेच केसांचे कोणतेही उपचार केले असतील तर केसांना रंग लावणे टाळावे. यासाठी आठवडाभर थांबून केसांना स्वतः कलर करावे, अन्यथा हेअर ट्रिटमेंटनंतर लगेच कलर केल्याने केस खराब होऊ शकतात. तसेच काहीवेळा हेअर ट्रिटमेंट् केल्यानंतर केसांना हेअर कलर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.