Join us  

केसांची देखभाल करायलाच वेळ नाही, घ्या हे ६ सुपर हॅक्स - एका मिनिट वेळ दिला तरी केस होतील सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2024 5:29 PM

Easy haircare for busy women Simple tips to keep your hair looking great : बिझी लाईफस्टाईलमुळे केसांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर सोप्या हॅक्सचा वापर करून केसांचे सौंदर्य ठेवा जपून..

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये आरोग्यासोबतच आपल्या केसांची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे असते. परंतु दिवसभर कामाच्या गडबडीत आपल्याला प्रत्येक गोष्टींची देखभाल व काळजी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अपुऱ्या वेळामुळे केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य होत नाही. एकदा सकाळी केस  बांधून टाकले की, परत आपण केसांकडे लक्षच देत नाहीत. मग सरळ दुसऱ्याच दिवशी आपण केस विंचरतो. या आपल्या वाईट सवयींमुळे केसांचे फार नुकसान होते. केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे केस खराब होऊ लागतात(Hair Styling Hacks For Busy Women).

ऑफिस आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे सहज शक्य होत नाही. याचा परिणाम त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरही होतो. योग्य काळजी न घेतल्याने ते केस गळू लागतात आणि कोरडे होतात, याचबरोबर केसांच्या अनेक समस्यासुद्धा निर्माण होतात. अशा परिस्थितीत काही स्त्रियांना केसांची योग्य ती निगा राखणे मोठे कठीण काम वाटते. जर तुम्हालासुद्धा तुमच्या बिझी लाईफस्टाईलमुळे केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर काही सोप्या हॅक्सचा वापर करून आपण आपल्या केसांचे सौंदर्य जपून ठेवू शकता(Easy haircare for busy women Simple tips to keep your hair looking great).

केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी काय करावे ? 

१. केस रोज धुवू नका :- केस रोज धुणे टाळा. काहीजणींना केस रोज धुण्याची सवय असते. परंतु धुतलेल्या केसांतील गुंता वेळच्या वेळी काढून त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर ते आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. म्हणून केस रोज धुणे टाळावे. 

२. केस धुण्याआधी केस विंचरून घ्यावेत :- केस धुण्याआधी ते कंगव्याने व्यवस्थित विंचरून केसातील गुंता सोडवून घ्यावा. यामुळे केस धुतल्यानंतर अधिक गुंता होत नाही. तसेच तो सोडवत बसण्यात जास्त वेळ जात नाही. म्हणून नेहमी केस धुण्याआधी केसातील गुंता सोडवून घ्यावा. 

फेस वॅक्सिंग केल्यावर त्वचेची आग होते? ४ सोपे उपाय, जळजळ-रॅश हा त्रास होणार नाही...

३. कोमट पाण्याचा करा वापर :- केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जर आपण केसांसाठी अनेक प्रकारचे केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरत असाल तर कोमट पाण्याने केस धुणे आपल्याला फायदेशीर ठरेल. जर आपण केसांसाठी हेयर सीरम, एसेंशियल ऑईल यांसारखे हेअर प्रॉडक्ट्स वापरात असाल तर ते सहजतेने स्कॅल्प मधून काढून टाकण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. 

४. शाम्पूच्या आधी कंडिशनर लावा :- शक्यतो आपण शाम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावतो. परंतु यात बराच वेळ जातो. तसेच कंडिशनर केसांना लावल्यावर थोडा वेळ वाट बघत बसावे लागते. यापेक्षा शाम्पू करण्याआधी केसांना कंडिशनर लावून घ्यावे. किंवा जर हा उपाय करायचा नसल्यास आपण केसांना तेल किंवा हेअर मास्क देखील लावून ठेवू शकता यामुळे देखील केस कंडिशनिंग केले जाऊ शकतात. 

चेहऱ्यावर येईल चमक, फक्त फेसवॉशपूर्वी ‘हे’ १ काम करा- फेशियल केल्यासारखा चेहरा दिसेल रोज...

५. कॉटन टीशर्टचा असा करा वापर :- केस धुवून झाल्यावर केसांना टॉवेलने बांधून ठेवण्यापेक्षा आपण कॉटन टीशर्टचा वापर करु शकता. टॉवेलने केस अधिक काळ बांधून ठेवल्यास ते तुटण्याची जास्त शक्यता असते. कॉटनच्या सॉफ्ट कापडाने किंवा एखाद्या टीशर्टने केस बांधून ठेवल्यास ते व्यवस्थित सुकले जातात. 

६. केसांची मुळे ओली ठेवू नका :- केस ओलेच ठेवणे टाळावे यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहचून ते तुटण्याची शक्यता असते. केस वाळवत असताना सगळ्यात आधी केसांची मुळे व्यवस्थित वाळवून घ्यावीत. जेणेकरून केसांचे फार नुकसान होणार नाही.

फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी