घनदाट, काळभोर, लांबसडक केस हा स्त्रियांच्या सौंदर्यातील सर्वात प्रमुख भाग आहे. अनेकजणी आपल्या केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हजारो उपाय सतत करत असतात. स्त्रियांचे सौंदर्य खुलविण्यात केसांची महत्वाची भूमिका असते. सध्या केसांना कलर करण्यापासून ते कुरळे केस कायमचे सरळ करण्यापर्यंत यांसारख्या अनेक गोष्टी आजकाल सगळ्याच स्त्रिया बिंनधास्तपणे करताना दिसतात. अशातच केसांना रिबॉन्ड आणि स्मुदनिंग करण्याचा ट्रेंड सध्या खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. शक्यतो रिबॉन्ड ही ट्रिटमेंट कुरळ्या केसांवर करण्यात येते, परंतु ज्यांचे केस सरळ असतात अशा स्त्रियाही सध्या केसांचे रिबॉण्डिंग करताना दिसतात.
सध्या लग्न, पार्टी, मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाण्यासाठी आपण जितके चांगले कपडे निवडतो तितकेच चांगली हेअर स्टाईल देखील करण्यावर भर देतो. केसांमुळे आपले व्यक्तीमत्व खूलून येते. सध्या कित्येकजणी केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी नवीन पर्याय ट्राय करतात. केसांची वेगळी हेयर स्टाईल करतात किंवा केसांसाठी वेगळी ट्रिटमेंट घेतात. हेयर रिबॉन्डिंगमुळे केस जितके सुंदर दिसतात तितकेच या ट्रिटमेंटनंतर त्यांची काळजी घेतली नाही तर केसांचे नुकसान देखील होते. हेयर रिबॉन्डिंग केसांची काळजी कशी घ्यावी यासाठी सोप्या टिप्स लक्षात ठेवू(6 Ways to Take Care of Your Rebonded Hair and Make It Last).
हेयर रिबॉन्डिंग करणे म्हणजे काय?
हेयर रिबॉन्डिंग एक केमिकल स्ट्रेटनिंग ट्रिटमेंट आहे, ज्यामध्ये तुमच्या केसांची मुळ संरचना बदलून त्यांना स्मुथ आणि स्ट्रेट केले जातो. यासाठी हिट आणि केमिकलच्या मदतीने केसांचा आकार बदलला जातो. केसांना उष्णता आणि दबाव दिल्यानंतर केसांना आपल्याला हवा तसा आकार देण्यात येतो. परंतु, यामुळे केसांमधील असलेले नैसर्गिक बंध तुटतात, ज्यामुळे क्युटिकल (सरळ) होतात. यालाच रिबॉन्डिंग म्हटले जाते. याला हेयर स्ट्रेटनिंग ट्रिटमेंट म्हणून देखील ओळखले जाते.
केस रिबॉन्डिंग केल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी?
१. सूर्यप्रकाशापासून केसांचे संरक्षण करा :- हेयर रिबॉन्डिंग केल्यानंतर केसांचे उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण सूर्याची किरणे तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात आणि त्यांचे नुकसान करू शकतात. त्यामुळे उन्हात बाहेर न जाण्याचा प्रयत्न करावा आणि बाहेर जाण्यापूर्वी केसांना सीरम लावायला विसरू नका, हे लावल्याने तुमचे केस सुरक्षित राहतील.
२. गरम पाण्याने केस धुवू नका :- हेयर रिबॉन्डिंग ट्रिटमेंट केल्यानंतर केस गरम किंवा कोमट पाण्याने धुवू नका. असे केल्याने तुमच्या केसांतील नैसर्गिक ओलावा पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर तुमचे केस पूर्वीसारखे होतील. अशावेळी केस धुण्यासाठी नेहमी सामान्य पाण्याचा वापर करावा.
मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...
३. या गोष्टी केसांना लावा :- केसांचे रिबॉन्डिंग करून घेतल्यानंतर केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर केसांवर रिबॉन्डिंगचा प्रभाव संपेल. अशा परिस्थितीत, रिबॉन्डिंग दीर्घकाळ केसांवर टिकण्यासाठी, केसांना तेलाने मसाज करणे, शॅम्पूनंतर कंडिशनर, आठवड्यातून एकदा स्पा ट्रिटमेंट्स आणि हेअर मास्क लावणे आवश्यक आहे जेणेकरुन तुमच्या केसांवर केलेली रिबॉन्डिंगची ट्रिटमेंट कायम चांगली राहील आणि रिबॉन्डिंगचा प्रभाव सहजासहजी कमी होणार नाही.
आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...
हेयर रिबॉन्डिंग केलेल्या केसांची काळजी कशी घ्यावी ?
१. सौम्य शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. आठवड्यातून किमान एकदा केसांसाठी डिप कंडिशनर वापरण्याची सवय ठेवा.
२. रिबॉन्ड केसांसाठी हेअर मास्क हा सर्वोत्तम पर्याय आहे.
३. सपाट लोखंड, कर्लिंग किंवा लोखंडासारखी केसांना उष्णता पोहोचवणारी हिट साधने वापरणे टाळा. याचा जास्त वापर केल्यास केस कोरडे आणि निर्जीव बनवू शकतात.