बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठीसुद्धा तितकीच ओळखली जाते. वयाच्या ५६ व्या वर्षीही माधुरी फिट दिसते. तिची त्वचा चमकदार असण्याबरोबच डागविरहीत देखील आहे. (Anti-ageing tips) माधुरी आपल्या त्वचेला काय लावते, तिची त्वचा इतकी का चमकते. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.(Skin care tips anti-ageing tips gave by madhuri dixit)
माधुरी दीक्षितने सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही टिप्स दिल्या आहेत. ज्या फॉलो केल्यास त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग दिसेल. माधुरीने व्हिडिओमध्ये सांगितले की त्वचेची आतून काळजी घेणं गरजेचं असतं. आपण जे काही खातो पितो त्याचा त्वचेवरही परिणाम होत असतो. आपण त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी काय खाता हे फार महत्वाचं असतं. (7 Beauty Secrets To Steal From Madhuri Dixit)
भरपूर पाणी प्या
माधुरीने एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ती त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि त्वचा हेल्दी राहते. दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरून त्वचा हेल्दी राहील.
तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नये
त्वचेच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी ऑयली फूड आणि गोड पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे त्वचेवर पिंपल्स, एक्ने येतात आणि त्वचेची नैसर्गिक चमकही कमी होते.
भाज्या खा
त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आहारात ताज्या भाज्या, फळांचा समावेश करा. ज्यूस पिण्याऐवजी फळांचे जास्तीत जास्त सेवन करा. ज्यूस प्यायल्याने त्यातील साखरेचे प्रमाण वाढते हे शरीरासाठी नुकसानकारक ठरते. याऊलट फळं फायबर्सनी परिपूर्ण असतात जे त्वचेला हेल्दी ठेवतात.
झोप
माधुरी दीक्षितने त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी झोप खूप महत्वाची असल्याचे सांगितले आहे. कमी झोपेमुळे चिडचिडपणा, त्वचेचा ग्लो कमी होणं अशा समस्या उद्भवतात. दिवसभरात कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप नक्की घ्या.
ताण घेऊ नका
त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी जास्त ताण घेऊ नका. अनेकदा जास्त ताणाचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. ताणतणावपासून बचावासाठी मेडीटेशन करा. रात्री झोपण्याआधी सकारात्मक विचार करा.
व्यायाम
व्यायाम हेल्दी स्किनसाठी गरजेचा असतो. व्यायाम केल्यानं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते. याशिवाय त्वचेवरही ग्लो येतो.
झोपण्याआधी मेकअप काढा
माधुरी दीक्षितने त्वचा चमकदार ठेवण्यासाठी सांगितले की, झोपण्याआधी मेकअप काढून मगच झोपा. रात्री स्किनवर मेकअप ठेवल्याने पिंपल्स येतात. पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक निघून जाते. रात्री झोपण्याआधी माईल्ड साबणाने चेहरा धुवून मगच झोपा.