सुंदर, काळेभोर, मजबूत, घनदाट केस कोणाला नको. आपण नियमित केस धुतो, केसांवर मसाज करतो. पण केसांची काळजी घेण्यासाठी एवढीच गोष्ट पुरेशी आहे का? केसांची बाह्य काळजी घेण्यासोबत आहाराची देखील काळजी घ्यायला हवी. कारण उत्तम आहाराचा सकारात्मक परिणाम केसांवर होतो. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, ओमेगा-३ फॅटी अॅसिड इत्यादींच्या कमतरतेमुळे केस खराब होतात. त्यामुळे आहारात कोणत्या गोष्टी बदलायला हवे? काय खायला हवे, याची माहिती कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचातज्ज्ञ डॉ. जतीन मित्तल यांनी दिली आहे(7 Best Hair Fall Control Food for Healthy Hair).
आहारात करा प्रोटीन्सचा समावेश
केसांची निगा राखण्यासाठी आहारात प्रोटीन्स असायला हवे. कारण केसांची रचना, वाढ आणि मजबुतीसाठी प्रथिने आवश्यक असतात. यासाठी आहारात मखना, शेंगदाणे, सोयाबीन, डाळ, चणे, दही, टोफू, कोथिंबीर-पुदिना आणि चीज यांचा समावेश करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याचे ५ फायदे, चेहरा न धुता झोपले तर...
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस
डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड (डीएचए) आणि इकोसापेंटायनोइक अॅसिड (ईपीए) केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे केसांची गळती कमी होते. केसांची मुळं मजबूत करण्यासाठी आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा समावेश असणं गरजेचं आहे. त्यामुळे तीळ, फ्लेक्ससीड, बटर, आणि अक्रोड खा. जे केसांना नैसर्गिक चमक देतात.
व्हिटॅमिन - बी
बी-कॉम्प्लेक्स हे बी व्हिटॅमिनचा समृद्ध स्रोत आहे. ज्यामुळे केस निरोगी राहतात. व्हिटॅमिन बी १२, बायोटिन (व्हिटॅमिन बी७), फॉलिक अॅसिड (व्हिटॅमिन बी९) इत्यादी केसांच्या वाढीस मदत करतात. स्प्राउट्स, कडधान्ये, बटाटे, गाजर आणि ब्रोकोली खाल्ल्याने केसांना बी-कॉम्प्लेक्स मिळतात.
चेहऱ्यावर चमचाभर दुधाची साय लावा; दिसाल तरूण-सुंदर, मिळतील फायदेच फायदे
व्हिटॅमिन - सी
आवळा, पेरू, संत्री, लिंबू इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे केसांची मजबुती वाढवते आणि केस गळणे थांबवते. व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने केसांची रासायनिक रचना, कोलेजन उत्पादन आणि केसगळती कमी होण्यास मदत होते.
हिमोग्लोबिनची कमतरता आयर्नने पूर्ण करा
केसांच्या मजबुतीसाठी लोह महत्वाचे आहे. कारण यामुळे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी आहारात सोयाबीन, डाळ, पालक आणि मनुका या पदार्थांचे समावेश करा.
१ चमचा मेथीचे दाणे आणि ३ उपाय -केसातला कोंडा-पांढरे केस-समस्या गायब
व्हिटॅमिन - ई
व्हिटॅमिन ई मजबूत आणि निरोगी केसांसाठी महत्वाचे आहे. कारण हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे. जे केसांचे मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. यासाठी आहारात काजू, बदाम, शेंगदाणे, सोयाबीन आणि तीळ यांचा समावेश करा.
पाणी पीत राहा
निरोगी शरीर आणि केसांसाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे. यामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि कोरडेपणा दूर होतो. यासाठी केस धुण्यासाठी टाईम - टेबल तयार करा. गरम पाण्याने केस धुणे टाळा.