Join us  

लांबचं धूसर दिसतं-चष्मा नको वाटतो? रोज ७ पदार्थ खा, नजर होईल तेज-डोळ्याचे आरोग्य सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 4:54 PM

Easy And Effective Ways To Increase Vision Naturally : चश्मा लागण्याचं मुख्य कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेणं हे असू शकतं

आजकाल म्हाताऱ्या माणसांपासून, लहान मुलांपर्यंत ते मध्यम वयाचे लोक प्रत्येकजण डोळ्यांच्या समस्येचा सामना करत आहे. कोणाला लांबच दिसत नाही तर कोणाला जवळचं दिसत नाही तर काहींना कमी वयातचा चश्मा लागला आहे. मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही यांसारख्या डिजिटल डिव्हाईसचा वाढता स्क्रिन टाईम याचं मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्याने लोकांचे आय-साईट्स कमकुवत होत आहेत.(Easy And Effective Ways To Increase Vision Naturally)

एका सर्वेनुसार भारतात  २०२० पर्यंत  २९ टक्के लोकांना चष्मा लागला होता. तुम्हालाही चश्मा उतरवायचा असेल तर काही सोपे उपाय करू शकता.  न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल यांच्यामते चश्मा लागण्याचं मुख्य कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेणं हे असू शकतं. काही सोपे उपाय करूनु तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. (How To Take Care Of Eyes)

पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट घ्या

आपल्या आहारात गाजर, हिरव्या पालेभाज्या, आंबट फळं आणि बीयांचे सेवन करा. व्हिटामीन सी, कॉपर आणि जिंकने परिपूर्ण या पदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. 

डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या

डोळ्यांना स्पर्श करण्यासाठी  हात स्वच्छ करा. घाणेरड्या हातांनी डोळ्यांवर रगडल्याने संक्रमण होऊ शकते.  यामुळे व्हायरल आणि बॅक्टिरेरियांचे संक्रमण होऊ शकते.  व्हायरस आणि बॅक्टेरियांचा प्रसार रोखण्यास मदत होते. 

भरपूर पाणी प्या

डोळे चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. ड्राय आईजची समस्या यामुळे टाळता येते. धुम्रपान मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू यांसारख्या समस्यांचे कारण ठरते. अशा स्थितीत डोळ्यांची आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सिगारेट, तंबाखूचे सेवन बंद करा. 

खोलित भरपूर उजेड असेल असे पाहा

लॅपटॉपवर काम करताना किंवा पुस्तकं वाचताना चांगला उजेड असणं महत्वाचे आहे. डोळ्यांवर उपकराणांचा जास्त लाईट आल्याने डोळ्यांवर ताण येतो. म्हणून वाचण्यासाठी किंवा काम करण्यासाठी अशी जागा शोधा जिथे प्रकाश व्यवस्थित असेल.

आय टेस्ट करून घ्या

वेळोवेळी डोळ्यांचे चेकअप करत राहा. ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या सुरूवातीलाच ओळखता येतील. ऊन्हात बाहेर जाताना सनग्लासेस घाला ज्यामुळे डोळ्यांचा युव्ही रेजपासून बचाव होतो. युव्ही रेजमुळे डोळ्यांच्या आरोग्याचे नुकसान होते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यडोळ्यांची निगा