श्रावणी बॅनर्जी
आता आपण घरीच आहोत आता कशाला चेहऱ्याला पाणी लावा असा विचार करणाऱ्या मुली आताशा कमी. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की, एकदा त्वचा खराब झाली की ती नीट होणं अवघड. त्यात फेसटाइम कॉल, फेसटाइम कॉफी भेट, इन्स्टाचे फोटो, यासाठी तरी घरात राहूनही चेहऱ्याची, त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण घरीच आहोत म्हणून दुर्लक्ष करू नका स्वत:कडे. काही गोष्टी आवर्जुन करा..
1.चेहरा आठवड्यातून किमान दोनदा तरी डीप क्लिनझिंग करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या त्वचेवरील छिद्र मोकळे होतात. चेहर्यावरील मळ व तेलकटपणा जातो. क्लेन्सिंग करण्यासाठी डीप क्लेन्सिंगडीप क्लिनझिंग फेसवॉश किंवा क्लिनझिंग मिल्क त्यासाठी वापरा.
2. क्लिनझिंग नंतर टोनिंगही आवश्यक. सध्या बाजारात खूप प्रकारचे टोनर्स आहेत पण स्वस्तात सोपा पर्याय म्हणजे गुलाब पाणी. ते कापसाने चेहऱ्याला लावा, ते कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं.
3. मॉयश्चरायझर तर रोज लावा. दिवसातून दोनदा किमान मॉयश्चरायझर लावणं मस्ट आहे. तुमच्या स्कीन टाइप नुसार मॉयश्चरायझर निवडावा .४. मस्करा लावणाच असाल तर एक सोपा नियम. जाड पापण्या असतील तर त्यांनी पारदर्शक किंवा ब्राऊन मस्करा वापरावा. पापण्या बारीक असतील तर काळा मस्करा वापरावा .५. डोळे नक्षीदार दिसण्या करिता ब्राऊन किंवा काळा आय लायनर लावावा. ६. लिपस्टिक ऐवजी तुम्ही डायरेक्ट टिंटेड लिप ग्लॉस पिंक, ब्राऊन किंवा पिच कलरमध्येही लावू शकता. ७. यासाऱ्यात आपल्या त्वचेची काळजी, पोत आणि उत्तम लूक हे महत्वाचं आहे. दुर्लक्ष न करणं उत्तम.