Join us  

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 7:41 PM

8 Jawline Exercises That Make Your Jawline More Defined : हनुवटी निमूळती असावी असं सगळ्यांनाच वाटतं मात्र फॅट्स वाढले की सगळ्या चेहऱ्याचा नूर पालटलो, म्हणूनच हे खास उपाय...

एखाद्या स्त्रीचे सौंदर्य जसे तिच्या बदामी डोळे, सुंदर केस, टोकदार नाकामुळे खुलून येते तसेच ते रेखीव जॉ लाइनमुळेही अधिक खुलून दिसते. चेहऱ्याची सुंदरता, सुबकता अधिक छान दिसावी यासाठी आपली जॉ लाईन परकेफ्ट असावी, असं प्रत्येकीला वाटत असत. कित्येकजणी आपली जॉ लाईन सुंदर व आकर्षक दिसावी यासाठी अनेक महागड्या ट्रिटमेंट्सचा वापर करतात. काहीजणींची जॉ लाईन(Exercises for a perfect jawline or facial shape) ही जन्मापासूनच सुंदर, आखीव - रेखीव असते. परंतु ज्यांची नसते त्यांना ती रेखीव सुंदर बनवण्यसाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात(Follow These 8 Simple Exercises To Get A Perfect Jawline).

सध्याची बदलती लाइफस्टाइल, व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत जात आहे. या वाढत्या लठ्ठपणामुळे आपल्या शरीराच्या काही भागांवर चरबी साठून राहते. आपला चेहरा, मान, हनुवटी या भागांत चरबी साचून राहिल्याने आपला चेहरा खूप जाड व फुगलेला दिसतो. हनुवटीवर साचलेल्या चरबीच्या थरांमुळे डबल चीन दिसण्याची समस्या अनेकींना त्रास देते. या डबल चीन मुळे आपली जॉ लाईन (Best Exercises for a Defined Jawline) देखील व्यवस्थित दिसत नाही. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. यासाठी परफेक्ट जॉ लाईन मिळवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा आपण घरच्या घरी काही सोपे व्यायाम प्रकार करुन परफेक्ट जॉ लाईन मिळवू शकतो(8 Amazing Ways to Get Perfectly Chiseled And Sharp Jawline).

परफेक्ट जॉ लाईन मिळवण्यासाठी नेमके कोणते व्यायाम प्रकार करावेत ?

१. सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्यानी आपल्या मानेपासून खालून सुरुवात करून वरच्या हनुवटीच्या दिशेने दाब देत मसाज करावा. 

२. त्यानंतर आपले दोन्ही अंगठे हनुवटीच्या बरोबर मधोमध ठेवून उजवा अंगठा जॉ लाईनवर दाब देत उजव्या कानापर्यंत न्यावा, त्याचप्रमाणे डावा अंगठा जॉ लाईनवर दाब देत डाव्या कानापर्यंत न्यावा. 

३. आता दोन्ही हातांच्या मुठी घट्ट करून बरोबर हनुवटीच्या मध्यभागी ठेवून हलकासा दाब द्यावा. आता उजव्या मुठीने उजव्या बाजूच्या जॉ लाईनवर दाब देत मसाज करावा. त्याचप्रमाणे डाव्या मुठीने डाव्या बाजूच्या जॉ लाईनवर दाब देत मसाज करावा. 

स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

४. एका हाताची घट्ट मूठ करून मानेपासून वर दोन्ही बाजूच्या जॉ लाईनवर सगळ्या बाजुंनी मसाज देत फिरवावी. 

५. आता दोन्ही हाताचे पहिले बोट व अंगठा यांच्या चिमटीत दोन्ही बाजूच्या जॉ लाईन पकडून मसाज करत कानापर्यंत दाब देत हात वर न्यावेत.     

फेशियल तर करतोच पण हे मेडी फेशियल नेमकं काय आहे, फेशियलचा नवा ट्रेंड...

दिवसभर ए.सी मध्ये बसता, ५ टिप्स - कोरडी - निस्तेज तर नाही झाली तुमची त्वचा ?

६. माश्यासारखा चेहरा करणे ही एक मजेशीर कला आहे. जेव्हा आपण फोटो काढत असतो तेव्हा माश्यासारखा चेहरा म्हणजेच पाऊट केल्यामुळे आपला  चेहरा लहान दिसण्यास मदत होते. माश्यासारखा चेहरा वरचेवर करत राहिल्यास चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल होते आणि चेहऱ्यावरील मांस कमी होण्यास मदत मिळते. यामुळे आपली जॉ लाईनदेखील परफेक्ट होते. 

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर...

७. मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चेहरा तरुण दिसण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर तेलाने किंवा मॉइश्चरायझरने चेहऱ्याला वर्तुळाकार मसाज केल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच हनुवटी, जॉ लाईन, गाल यांचा मसाज करणे हे तरुण दिसण्यासाठी उपयुक्त ठरते. आपण बर्फाच्या क्युबच्या साहाय्याने देखील चेहऱ्याला मसाज करू शकता.

८. गालाचे स्नायू वर खेचले जातात आणि चेहऱ्यावरील स्नायूंचा व्यायाम होईल त्यांवर हलकासा ताण येईल असे एक्सरसाइज करण्यावर भर दिल्यास आपण काही दिवसातच परफेक्ट जॉ लाईन मिळवू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्स