Join us  

केसांचं गळणं थांबतच नाही? लांबसडक, काळ्या केसांसाठी ९ उपाय, केस राहतील मुळांपासून मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 6:00 PM

Tips For Long And Thick Hair : वारंवार केस धुणे टाळा. केसांमधला कोंडा टाळण्यासाठी टाळू स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जे कमकुवत केसांचे प्रमुख कारण आहे.

लांब केस हे प्रत्येक महिलेला हवेहवेसे वाटत असतात. लांब केसांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.(Hair Care Tips)  केस वाढवणं सोपं असू शकतं पण केसांची योग्य पद्धतीनं काळजी घेणं अवघड असतं. अनेकदा केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं केस गळायला लागतात तर कधी खूप तुटतात. (Tips For Long And Thick Hair)  आपले केस हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण ते केसांशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत करते. ज्याकडे सहसा आपल्यापैकी बरेच लोक दुर्लक्ष करतात. आपल्या केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि त्यांची ताकद आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी कंडिशनिंग आवश्यक आहे. (How To Grow Hairs Faster)

 केसांची चांगली वाढ होण्यासाठी काय करावं? (How to grow hair faster naturally in a week)

सध्या, आपल्यापैकी बहुतेकजण आपल्या वेळापत्रकात व्यस्त असतात आणि आपल्या आहारावर फारसे लक्ष केंद्रित करत नाहीत.  नियमित व्यायामासह संतुलित आहार घेतल्यास केसांची झपाट्याने वाढ होते. निरोगी दिनचर्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते आणि तणाव कमी करते.

1) झोप घेणं

केसांच्या वाढीसाठी झोप हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. कारण ते आपल्या केसांवर आणि त्वचेच्या आरोग्यावर परिणाम दर्शविते. हे लक्षात ठेवले पाहिजे की केस तुटण्यापासून बचाव करण्यासाठी झोपण्यापूर्वी केस लूज वेणी घालून बांधायला हवेत.

2) केस घट्ट बांधू नका

केसांच्या मुळांना कमकुवत करणारे आणि केसांच्या वाढीस अडथळा आणणारी घट्ट केशरचना करणे टाळा. सहज उपलब्ध असलेले तुमचे केस बांधण्यासाठी रबरबॅ ण्डचा वापर केला जाऊ शकतो. 

3) योग्य ब्रशचा वापर

तुमच्या केसांसाठी योग्य ब्रश वापरण्याची खात्री करा ज्यामध्ये रुंद दात असलेला असू शकतो. कुरळे केस टाळण्यासाठी रॅट टेल कॉम्ब वापरण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तसेच, झोपण्यापूर्वी ब्रशनं केस विंचरल्यानं योग्य रक्ताभिसरण आणि केसांची वाढ होते. 

4) हेअर मास्क

आपल्या केसांचे पोषण करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. हेअर मास्क लावून तुमचे फॉलिकल्स हायड्रेटेड ठेवा

5) केस ट्रिम करा

नियमित ट्रिम केल्याने केसांची वाढ जलद गतीने होते. follicles मजबूत करण्यासाठी हेअर स्पा आवश्यक आहे. शिवाय, आपल्या केसांना जास्त वेळा रंग देणे टाळा कारण यामुळे तुमचे केस खराब होतात.

 घरीच सागर वेणी घालण्यासाठी सोप्या ट्रिक्स; ५ मिनिटात होईल सुंदर हेअरस्टाईल

6) शॅम्पूची निवड

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुमचे शॅम्पू काळजीपूर्वक निवडा. तुमचा शॅम्पू तुमच्या टाळूला हानी पोहोचवणारे केमिकल्स सल्फेट आणि पॅराबेन रहीत असावा याची खात्री करा.  चांगल्या केसांसाठी आपण हर्बल शॅम्पू निवडू शकता.

7) हेअर वॉश

वारंवार केस धुणे टाळा. केसांमधला कोंडा टाळण्यासाठी टाळू स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जे कमकुवत केसांचे प्रमुख कारण आहे.

8) केस व्यवस्थित सुकवा

आपले केस टॉवेलने कोरडे करून घ्या. टॉवेल काळजीपूर्वक आणि हळूवारपणे गुंडाळा. ही पद्धत केसांचे तुटणे टाळते. ब्लो ड्रायिंग ही बर्‍याच जणांसाठी सामान्य आहे, परंतु ते टाळणे आणि आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे करणे चांगले आहे.

टॅग्स :केसांची काळजीहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स