Join us  

चमचाभर कॉफीची जादू, कॉफीत मिसळा एक पिवळी गोष्ट, चेहरा चमकेल हिऱ्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 1:02 PM

A coffee face mask can benefit every skin type! : कॉफी प्या आणि चेहेऱ्यालाही लावा, पाहा चमचाभर कॉफीची इन्स्टंट कमाल..

प्रत्येकाची सकाळ चहा किंवा कॉफीने (Coffee) होते. चहाप्रेमी कॉफी प्रेमींची संख्या देखील जास्त आहे. कॉफी प्यायल्याने झोप तर उडतेच, शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय तरतरीही येते. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराला असंख्य लाभ मिळतात. पण याचा वापर आपण कधी त्वचेसाठी करून पाहिलं का? कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.

जे मुरुमांचे डाग, सुरकुत्या यासह इतर त्वचेच्या निगडीत समस्या दूर करण्यास मदत करतात (Coffee Facemask). पण कॉफीचा वापर त्वचेवर कसा करायचा? कॉफीचा वापर केल्याने त्वचेच्या निगडीत समस्या सुटतील का? स्किन टाईटनिंगसाठी कॉफीचा फेसपॅक कसा तयार करायचा पाहूयात(A coffee face mask can benefit every skin type!).

अशा पद्धतीने तयार करा कॉफीचा फेसपॅक

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर, कॉफीचा फेसपॅक लावा. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे कॉफी आणि २ चमचे मध घेऊन गुळगुळीत पेस्ट तयार करा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या. हातावर कॉफीची तयार पेस्ट घ्या. धुतलेल्या चेहऱ्यावर पेस्ट लावा. आपली मान काळवंडलेली असेल तर, त्यावरही पेस्ट लावा. १५ मिनिटांसाठी पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर हाताने रगडून पेस्ट काढून घ्या, व पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. यामुळे ड्राय झालेली स्किन मुलायम होईल. जर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर, या फेसपॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करा.

फक्त १ चमचा कच्च्या दुधाची जादू, महागडे कॉस्मेटिक पडतात फिके इतका येईल चेहऱ्यावर ग्लो

चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे फायदे

मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आपण कॉफी मास्क तयार करून लावू शकता. कॉफीमुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण नियंत्रित राहते. चेहऱ्यावर असणारी छिद्रे भरुन निघतात. शिवाय त्वचा मऊ होते. कॉफीमध्ये सॉफ्टनिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात. यामुळे ड्राय स्किनपासून सुटका मिळते.

२ चमचे तांदळाच्या पिठाची जादू, चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो! तांदळाच्या पिठात मिसळा १ गोष्ट

चेहऱ्यावर मध लावण्याचे फायदे

मध नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. शिवाय चेहऱ्यावर साचलेली घाण, ब्लॅकहेड्स दूर करतात. यातील अॅंटी-मायक्रोबियल आणि अॅंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म हे मुरुंमांचे डाग दूर करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी