Lokmat Sakhi >Beauty > नेलपॉलिश लावताय जरा सावधान ! आरोग्याच्या दृष्टीने ठरु शकते हानिकारक..तज्ज्ञ सांगतात...

नेलपॉलिश लावताय जरा सावधान ! आरोग्याच्या दृष्टीने ठरु शकते हानिकारक..तज्ज्ञ सांगतात...

Your Nail Polish Could Be Disrupting Your Hormone System : नेलपॉलिश लावणे महिलांसाठीही घातक ठरू शकते, याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम अपायकारक ठरु शकतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 07:47 PM2023-07-14T19:47:39+5:302023-07-14T20:06:00+5:30

Your Nail Polish Could Be Disrupting Your Hormone System : नेलपॉलिश लावणे महिलांसाठीही घातक ठरू शकते, याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम अपायकारक ठरु शकतात...

A look at the effects of nail polish on nail health and safety. | नेलपॉलिश लावताय जरा सावधान ! आरोग्याच्या दृष्टीने ठरु शकते हानिकारक..तज्ज्ञ सांगतात...

नेलपॉलिश लावताय जरा सावधान ! आरोग्याच्या दृष्टीने ठरु शकते हानिकारक..तज्ज्ञ सांगतात...

सर्वसाधारणपणे महिलांना त्यांच्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेल आर्ट करायला आवडते आणि त्यासाठी नखांवर विविध प्रकारचे नेलपेंट त्या लावतात. याचबरोबर असे घडते की स्त्रिया नेलपेंट घेण्यासाठी खूप पैसे देखील खर्च करतात. हातापायांचे वेळच्या वेळी मेनिक्युअर, पेडीक्युअर करणे, त्यांची काळजी घेणे, नेलपेंट लावून त्यांची सुंदरता अधिक वाढवणे अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात. महिलांना नेलपॉलिश लावायला आवडते, कारण त्याच्या वापराने त्यांची नखे आणखीनच सुंदर दिसतात. परंतु नखांना लावले जाणारे नेलपॉलिश आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, याची आपल्याला कल्पना आहे का? 

नेलपॉलिश बनवण्यासाठी अनेक प्रकारची हानिकारक रसायने व केमिकल्स वापरली जातात. ही रसायने व केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात.आयुर्वेदिक फिजिशियन आणि थायरॉईड तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांनी नेलपॉलिशचे दुष्परिणाम आणि त्याच्या वापराशी संबंधित काही महत्त्वाच्या खबरदारी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत. नेलपॉलिशचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो?, नेलपॉलिश सुकल्यानंतरही ती हानिकारक ठरू शकते का?, नखांना नेलपॉलिश लावणे कायमचे बंद करावे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून दिली आहेत(A look at the effects of nail polish on nail health and safety).

नेलपॉलिश लावल्याने हार्मोन्स असंतुलित होतात का- नेलपॉलिशचा हार्मोन्सवर काय परिणाम होतो का?

आपण काही स्त्रिया पाहतो ज्या केवळ एका हाताच्या नखांवरच नेलपेंट लावतात कारण त्यांना घरातील इतर कामेही करावी लागतात. तर काही महिला या दोन्ही बोटांच्या नखांना नेलपेंट लावतात. परंतु थेट असे नखांवर नेलपेंट लावणे हे तज्ज्ञांच्या मते चुकीचे आहे. आपण लावलेल्या नेलपेंटमध्ये अनेक हानिकारक रसायने व केमिकल्स असतात, ही रसायन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. याचबरोबर हातांना लावलेल्या नेलपेंट मार्फत ही रसायने व केमिकल्स आपल्या पोटात जातात. आपल्यापैकी बहुतेकजण हे अन्नपदार्थ खाण्यासाठी उजव्या हाताचा वापर करतात. यामुळे जर आपण उजव्या हाताला नेलपेंट लावली तर, अन्नपदार्थ खाताना यातील विषारी घटक आपल्या पोटात जाऊन बिघाड करु शकतात. डॉ. अलका विजयन यांच्या मते, "नेलपॉलिशमध्ये टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड, फॅथलेट आणि टीपीएचपी ही मुख्यतः ५ प्रकारची रसायन आढळून येतात. ही सर्व रसायने शरीरातील आतील अवयवांच्या कार्य पद्धतीत बिघाड घडवून आणतात किंवा कार्यपद्धती विस्कळीत करतात, तसेच प्रजनन संप्रेरकांवर परिणाम करतात. हे विषारी घटक जेवणामार्फत केवळ आपल्या पोटातच जात नाहीत तर त्याचबरोबर आपल्या रक्तवाहिन्या आणि लघवीवरही याचा परिणाम दिसून येतो. नेलपॉलिश लावल्यानंतर पुढच्या ५ दिवसांपर्यंत ही रसायने अन्नातून आपल्या शरीरात प्रवेश करतात.

नेलपेंट बाटलीतच कडक होते, वाया जाते? ४ उपाय - नेलपेंट सुकणारच नाही, टिकेल अनेक महिने...

१. फॅथलेट :- यामुळे संप्रेरकांमध्ये बदल , मधुमेह आणि थायरॉईड कार्यात अडथळा येऊ शकतो. 
२. टोल्युएन :- डोळ्यांची जळजळ होऊन मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते.
३. फॉर्मल्डिहाइड :- कर्करोगास कारणीभूत ठरणारे रसायन.

नेलंपेंट सुकल्यानंतरही ही रसायने हानिकारक आहेत का?

नेलंपेंट सुकल्यानंतरही नेलंपेंटचे हानिकारक रसायन आपल्या शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. नेलंपेंट वापरल्यानंतर काही तासांपर्यंत TPHP रसायनाचा प्रभाव आपल्या शरीरात राहतो, असे आढळून आले आहे. ज्या महिलांना नखे ​​चावण्याची सवय असते त्यांच्यासाठी ते खूप हानिकारक ठरू शकते. 

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...

हातापायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरा प्युमिक स्टोनची जादू... हातापायांचे सौंदर्य येईल खुलून...

यामुळे नखांना नेलपॉलिश लावणे कायमचे बंद करावे का ?

डॉ. अलका विजयन यांच्या मते, " आपण नखांवर नेलपॉलिश लावणे पूर्णपणे कायमचे बंद करणे गरजेचे नाही, आपल्याला फक्त काही खबरदारी घेणे आवश्यक आहे", जसे की नेलपेंटचा थेट अन्नाशी संपर्क टाळण्यासाठी ते उजव्या हातावर लावणे टाळावे. याचबरोबर दर दोन आठवड्यांनी नेलंपॉलिश काढा आणि आपल्या नखांना एक किंवा दोन दिवस असेच नेलपेंट्स न लावता तसेच राहू द्यावे. 

ड्राय शाम्पू खरेच केसांसाठी चांगला असतो? तज्ज्ञ सांगतात फायदे तोटे....
 

नेलपॉलिश खरेदी करताना ही ८ रसायने आधी तपासून पहा... 

नेलपॉलिशमध्ये फॉर्मल्डिहाइड, टोल्युइन, डीबीपी, फॉर्मल्डिहाइड रेझिन, जाइलीन, इथाइल टॉसिलामाइड आणि ट्रायफेनिल फॉस्फेट यांसारखी रसायने नाहीत ना हे सर्वात आधी तपासून पहा. या ८ रसायनांपासून मुक्त असलेल्या नेलपॉलिशचाच वापर आपल्या नखांवर करावा.

Web Title: A look at the effects of nail polish on nail health and safety.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.