त्वचा सुंदर दिसावी यासाठी सगळ्याचजणी आपल्या त्वचेची भरपूर काळजी घेतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. कुणी घरगुती उपाय करतात तर कुणी थेट दर ( 5-Minute Salon-Like Cleanup Routine At Home) महिन्याला पार्लर गाठतात. पार्लरमध्ये जाऊन (Face Clean Up Steps for All Skin Types) आपण त्वचेसाठी क्लिनअप, फेशियल, स्क्रबिंग, ब्लिचिंग अशा अनेक स्किन ट्रिटमेंट्स करुन घेतो. परंतु या स्किन ट्रिटमेंट्स काहीवेळा खूप महागड्या असतात. एवढंच नव्हे तर, काहीवेळा पार्लरमध्ये या स्किन ट्रिटमेंट्स करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरले जातात. यामुळे स्किनचे नुकसान होऊ शकते(A Step By Step Guide On How To Do A Face Cleanup At Home).
पार्लरमध्ये जाऊन आपण दर महिन्याला किमान क्लिनअप तरी करूनच घेतो. परंतु हेच क्लिनअप आपण घरच्याघरीच देखील करु शकतो. पार्लरमध्ये जाऊन केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन क्लिनअप करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून नैसर्गिकरित्या घरच्याघरीच क्लिनअप करु शकतो. सोप्या ४ स्टेप्समध्ये पार्लरसारखे नैसर्गिक क्लिनअप घरच्याघरी कसे करायचे ते पाहूयात. beautifulyouforever या इंस्टाग्राम अकाउंटवरून घरच्याघरीच सोप्या ४ स्टेप्समध्ये पार्लरसारखे क्लिनअप कसे करावे याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे(How To Do A Face Clean Up At Home A Step-By-Step Guide).
घरच्याघरीच क्लिनअप करण्यासाठी नेमकं काय करावं ?
१. स्टेप १ :- फेसवॉश :- क्लिनअप करण्याची सगळ्यांत पहिली स्टेप म्हणजे फेसवॉश करणे. आपण नेहमी ज्याप्रमाणे फेसवॉश करतो त्याचप्रमाणे फेसवॉश करुन घ्यावा. नेहमीचा साबण किंवा फेसवॉश वापरुन चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...
२. स्टेप २ :- वाफ घेणे :- क्लिनअप करण्याच्या दुसऱ्या स्टेपमध्ये त्वचेला स्टिमिंग करायचे आहे. त्वचेला सोसवेल इतक्या गरम पाण्याची वाफ त्वचेला द्यावी. ३ ते ५ मिनिटे त्वचेला वाफ द्यावी.
३. स्टेप ३ :- मसाज करावा :- तिसऱ्या स्टेपमध्ये त्वचेला मसाज करून घ्यावा. त्वचेला मसाज करण्यासाठी सर्वात आधी कच्चा बटाटा किसणीवर किसून त्याचा रस काढून घ्यावा. या कच्च्या बटाट्याच्या रसात एक टेबलस्पून मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे. आता हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण त्वचेला अलगद लावून हलकेच हाताने चोळून त्वचेला २ ते ३ मिनिटे मसाज करुन घ्यावा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
व्हेलेंटाईन्स डेला दिसायचंय स्पेशल? वापरा हे ३ घरगुती नॅचरल फेसपॅक, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...
४. स्टेप ४ :-फेसपॅक :- घरच्याघरीच क्लिनअप करण्याची सर्वात शेवटची स्टेप म्हणजे त्वचेला फेसपॅक लावणे. त्वचेला फेसपॅक लावण्यासाठी आधी घरगुती पदार्थांचा वापर करुन फेसपॅक तयार करून घ्यावा. फेसपॅक तयार करण्यासाठी सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून बेसन, १/२ टेबलस्पून हळद आणि कच्च्या बटाट्याचा रस घालावा. आता चमच्याने सगळे जिन्नस हलवून एकजीव करुन फेसपॅक तयार करून घ्यावा. हा तयार फेसपॅक त्वचेवर १५ मिनिटे किंवा संपूर्णपणे सुकेपर्यंत तसाच लावून ठेवावा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. दर १५ दिवसांनी हे क्लिनअप करावे यामुळे आपली त्वचा अधिकच सुंदर दिसू लागेल तसेच त्वचेच्या अनेक समस्या देखील कमी होतील.
कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...
अशाप्रकारे आपण घरच्याघरीच सोप्या ४ स्टेप्समध्ये पार्लरसारखे महागडे क्लिनअप अगदी स्वस्तात करु शकतो.