सुंदर, मुलायम, तजेलदार त्वचेसाठी मुलतानी माती फार पूर्वीपासून वापरली जात आहे. स्किन आणि केसांचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी मातीमुळे केवळ त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होते असे नव्हे तर त्यामुळे डार्क स्पॉट कमी होणे आणि स्किन टोन सुधारण्यासही मदत होते. मुलतानी माती तुमच्या त्वचेवरील प्रत्येक प्रकारचे ऑइल, धूळ-माती आणि डेड स्किनला हटवण्यास मदत करते. मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. मुलतानी माती नियमितपणे लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते(According to dermatologist who should not use multani mitti on face).
चेहऱ्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून मुलतानी माती वापरली जाते. याच्या वापरामुळे त्वचा सुंदर आणि छान होते. चेहऱ्यावर असणारे काळे डाग , पिगमेंटेशन देखील मुलतानी मातीच्या वापराने कमी होण्यास मदत होते. मुलतानी मातीमध्ये मिनरल्सचे प्रमाण जास्त असल्याकारणाने याचा त्वचेला खूप फायदा होतो. मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ आणि ग्लोइंग होते. मात्र याच मुलतानी मातीचा जास्त प्रमाणात वापर केला तर त्याचे अनेक नुकसान चेहऱ्याला होऊ शकतात. मुलतानी माती ही सगळ्याच स्किन(Who should not use Multani Mitti)टाईपसाठी सूट होत नाही, अशांनी जर मुलतानी माती स्किनला लावली तर स्किन प्रॉब्लेम्स आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नेमके मुलतानी माती कोणी वापरु नये ते पाहूयात.
हा स्किन टाईप असणाऱ्यांनी मुलतानी माती वापरू नये...
शक्यतो आपण मुलतानी मातीचा वापर स्किनसाठीच जास्त प्रमाणात करतो. जेव्हा मुलतानी माती त्वचेवर लावली जाते तेव्हा ती एखाद्या स्पंज प्रमाणेच काम करते. आपल्या त्वचेत असणारा ओलावा आणि मॉइश्चरायझर अधिकाधीक शोषून घेण्याचे काम मुलतानी माती करते. ज्यांची स्किन ऑयली आहे त्यांच्यासाठी मुलतानी माती लावणे फायदेशीर ठरते. परंतु ज्यांची स्किन ड्राय किंवा कोरडी, रुक्ष आहे त्यांनी चुकूनही त्वचेवर मुलतानी माती लावू नये. मुलतानी मातीत मिनरल्स आणि अॅल्युमिनियम सिलिकेट फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या मातीत शोषून घेण्याची जबरदस्त क्षमता असते. मुलतानी माती तेलकट त्वचेवर अधिक जास्त फायदेशीर ठरते. यातील पोषक घटक त्वचेतील अतिरिक्त तेल आणि धूळ - माती हटवण्यास मदत करतात. जर तुमची त्वचा अधिक जास्त तेलकट असेल आणि त्वचेवर खूप पिंपल्स असतील तर मुलतानी माती लावणे फायदेशीर ठरेल.
केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अवैस आरिफ यांच्यानुसार, ऑयली स्किन असणाऱ्यांनी आठवड्यातून किमान १ ते २ वेळा मुलतानी मातीचा फेसपॅक बनवून त्वचेला लावावा. जेव्हा स्किनवर लावलेली मुलतानी माती काढायची असेल तेव्हा चेहरा आधी ओला करावा. त्यानंतर हलकेच हातांनी चेहऱ्यावरील मुलतानी माती काढून घ्यावी. त्वचेवर लावलेली मुलतानी माती जर संपूर्णपणे सुकली असेल तर ती रगडून किंवा घासून काढू नये. यामुळे स्किनवर रॅश किंवा इजा होऊ शकते.
मुलतानी माती चेहऱ्याला लावणे खरोखरच हानिकारक आहे का?
खरंतर त्वचेसाठी मुलतानी माती उत्तम मानली जाते. मात्र याचा वापर योग्य प्रमाणात केला नाही तर स्किनला बरेच नुकसान होऊ शकते.
१. कोरडी त्वचा :-
काहीजण मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावतात. पण अशावेळी ऋतू पाहून मगच हा लेप चेहऱ्याला लावावा. हिवाळ्यात मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये. हिवाळ्यात या लेपने तुमची स्किन कोरडी पडू शकते.
२. त्वचा ताणली जाऊ शकते.
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती लावण्याआधी त्यात एलोवेरा जेल (Aleovera gel) , बदामाचे तेल (Almond Oil) किंवा मध (Honey) मिक्स करावा. फक्त मुलतानी माती चेहऱ्याला लावल्यास तुमची त्वचा कोरडी पडते आणि वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
३. संवेदनशील त्वचा असल्यास होते नुकसान...
तुमची त्वचा नाजुक (Sensitive) असल्यास मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. नाजुक त्वचेवर मुलतानी मातीचा लेप लावल्यास चेहऱ्यावर इनफेक्शन होऊ शकते.
जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर..
"या" प्रकारच्या त्वचेच्या लोकांनी मुलतानी मातीचा वापर करणे टाळावे...
१. ज्यांची त्वचा नाजुक आहे अशांनी मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. याच्या वापराने चेहरा काळा पडू शकतो.
२. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी देखील मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये. ज्यामुळे त्वचा मोठ्या प्रमाणात ताणली जाऊ शकते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
३. जर तुम्हाला कायम सर्दी , खोकला असेल तर मुलतानी माती वापरू नये. थंड असलेल्या मुलतानी मातीच्या वापरामुळे सर्दी , खोकला वाढण्याची शक्यता असते.
४. मुलतानी माती रोज चेहऱ्याला लावणे टाळावे.