Rice Water Ice Cubes For Glowing Skin : सामान्यपणे जास्तीत जास्त महिलांचा कल त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या प्रोडक्ट्सकडे असतो. पण त्यांना हे माहीत नसतं की, महागड्या प्रोडक्ट्सपेक्षाही फायदेशीर काही घरगुती उपाय असतात. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. हे नॅचरल घरगुती उपाय स्वस्तात तर होतातच सोबतच यांचे काही साइड इफेक्ट्सही नसतात. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी, चेहरा उजळ करण्यासाठी, पिंपल्स-रिंकल्स दूर करण्यासाठी असे अनेक घरगुती उपाय आहेत. असाच एक घरगुती उपाय म्हणजे तांदळाच्या पाण्याचे आइसक्यूब.
योगा टीचर स्निग्धा यांनी एका व्हिडिओत सांगितलं की, पाण्यात तांदूळ टाकून जर आइस क्यूब्स तयार केले आणि ते चेहऱ्यावर लावले तर चेहऱ्यावरील डाग जातील आणि चमकदारही होईल. अशात हे आइस क्यूब्स कसे तयार कराल हे जाणून घेऊ.
तांदळाच्या पाण्याचे आइस क्यूब्स
योगा एक्सपर्टनी सांगितलं की, केवळ २ गोष्टींपासून तयार आइस क्यूब तुमच्या चेहऱ्यावर महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा जास्त ग्लो आणू शकतो. यासाठी एका वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घ्या. नंतर तांदळात २ ते ३ पट जास्त पाणी टाकून रात्रभर तसेच ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून तांदूळ वेगळा काढा. या तांदळाच्या पाण्यात व्हिटामिन ई ची कॅप्सूल पिळून टाका. ती चांगली मिक्स करा. आता हे पाणी आइस स्ट्रेमध्ये टाकून फ्रिजरमध्ये ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी या बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मालिश करा. आठवडाभर जर हा उपाय केला तर त्वचा उजळेल आणि एक वेगळा ग्लो येईल.
तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
तांदळाच्या पाण्यामध्ये अॅंटी-एजिंग आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे पाणी चेहऱ्यावर लावल्यानं स्किनच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतात. यानं चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो. तसेच चेहरा आणखी तरूण दिसतो. डाग, सुरकुत्या दूर करण्यास हे पाणी खूप फायदेशीर ठरतं.
टोनरसारखा करा वापर
तांदळाचं पाणी चेहऱ्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं लावू शकता. हे पाणी चेहऱ्यावर टोनरसारखंही लावू शकता. तांदळाचं पाणी रूईमध्ये भिजवून त्वचेवर लावलं तर चेहऱ्यावरील धूळ-माती-मळ निघून जाईल.