Join us  

मुरुम पुटकुळ्यांचे डाग जाता जात नाही.. या चिवट डागांवर करा 5 सोपे घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 7:31 PM

चेहऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्या गेल्या तरी डाग मात्र तसेच राहातात. हे डाग कितीही उपाय केले तरी जात नाहीत म्हणून न वैतागता 5 घरगुती उपाय करुन् पाहा. चेहऱ्यावरचे डाग घालवणं किती सोपं असं वाटल्याशिवाय राहणार नाही. 

ठळक मुद्देमुरुम पुटकुळ्या सुकल्या की निघून जातात, पण त्या फोडल्या की डाग राहातातच. तेलकट त्वचेवर तर मुरुम पुटकुळ्या सतत येत जात राहातात. यासाठी घरात टी ट्री ऑइल असायलाच हवं.  बेकिंग सोडा हा त्वचेच्या अनेक समस्या सोडवण्यासाठीचा प्रभावी उपाय आहे. 

डागरहित चेहरा  हा मेकअप करुन चेहऱ्यावरचे डाग झाकले तरच शक्य आहे असं वाटतं का? त्वचा जर तेलकट प्रकाराची असेल तर मुरुम पुटकुळ्यांचं येणंजाणं सतत सुरुच असतं. हार्मोनची पातळी वर खाली झाली की त्याचाही परिणाम चेहऱ्यावर होतो. मुरुम पुटकुळ्या  सोबत मोठे मोठे फोडही येतात. मलम औषधांनी ते बरे होतात पण चेहऱ्यावर डाग मात्र तसेच राहातात.

Image: Google

मुरुम पुटकुळ्या आल्या की त्या लवकर जाव्यात म्हणून नखं लावून काढण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे त्या जाणं तर सोडाच पण मोठ्या होतात. त्यामुळे डागही मोठे पडतात. खरंतर् मुरुम पुटकुळ्या येतात, त्या सुकल्या की निघून जातात. त्यांना हात लावला नाही, फोडण्याचा प्रयत्न केला नाही तर डाग पडत नाही. पण चेहऱ्यावर मुरुम् पुटकुळ्या आल्या की हात न लावण्याचा संयम राहातो कुठे? सतत स्पर्श केल्यानं हाताच्या उष्णतेनं, हात जर अस्वच्छ असतील तर दूषित घटकांमुळे मुरुम पुटकुळ्या चेहऱ्यावर पसरतात. अनेकांच्या बाबतीत मुरुम  पुटकुळ्यांचा त्रास विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच राहातो. पण हात लावून  समस्या मोठ्या करण्याच्या सवयीमुळे डाग मात्र जाता जात नाही. मुरुम पुटकुळ्यांच्या या चिवट डागांसाठी चार सोपे घरगुती उपाय आहेत.   मुरुम पुटकुळ्या असतांना ते लगेच केल्यास  मुरुम पुटकुळ्यांचे डाग राहात नाही. 

Image: Google

चेहऱ्यावरचे डाग घालवताना..

1. चेहऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे टूथपेस्ट. रात्री झोपताना चेहरा नीट धुवावा. तो रुमालानं टिपून घ्यावा. मग हातावर थोडी टूथपेस्ट् घेऊन ती चेहऱ्यावर लावावी.  या उपायामुळे मुरुम पुटकुळ्यांचा आकार कमी होतो आणि त्या पटकन सुकण्यासही मदत होते.

2. तेलकट त्वचा असेल तर मुरुम पुटकुळ्या सतत येत राहातात. यासाठी घरात टी ट्री ऑइलची बाटली अवश्य असू द्यावी.  टी ट्री ऑइलचे चार थेंब एक चमचा गुलाब पाण्यात घालावेत. ते चांगलं एकत्र  करावं आणि मग हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. हा उपाय नियमित केल्यास मुरुम पटकन जातात आणि डागही पडत नाही. 

Image: Google

3.  बेकिंग सोडा हा त्वचेच्या समस्येसाठी फार उपयुक्त मानला जातो. एक चमचा बेकिंग सोडा घ्यावा. त्यात पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. चेहरा आधी धुवून आणि रुमालानं टिपून घ्यावा. मग ही बेकिंग सोड्याची पेस्ट मुरुम पुटकुळ्यांवर लावावी. पाच मिनिटं ठेवावी आणि मग कोमट पाण्यानं चेहरा धुवावा. यामुळे मुरुम पुटकुळ्यांचा आकार कमी होतो, त्या लवकर सुकतात आणि डागही पुसट होतात. 

4. लसणामुळे मुरुम पुटकुळ्या पटकन निघून जातात आणि चेहऱ्यावर डाग असले तर तेही लवकर  जातात. यासाठी लसणाच्या एक दोन पाकळ्या ठेचून घ्याव्यात . लसणाची पेस्ट मुरुम पुटकुळ्यांवर लावावी. यामुळे थोडी आग होते. 5-10 मिनिटांनी चेहरा गार पाण्यानं धुवावा.

Image: Google

5. ॲपल सायडर हाही मुरुम पुटकुळ्यांवरचा उत्तम उपाय आहे. फक्त ॲपल सायडर थेट चेहऱ्यावर कधीच लावू नये. ते पाण्यात मिसळूनच लावायला हवं. त्वचा जर संवेदनशील असेल तर ॲपल सायडर, पाणी आणि टी ट्री ऑइलचे 2-3 थेंब घालावेत. ते चांगलं मिसळून मग चेहऱ्यावर लावावं. 5-10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी