Lokmat Sakhi >Beauty > अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा

अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा

Ananya Panday's Festive Ethnic Look: सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन सुरू झालं आहे. अशाच एका दिवाळी सेलिब्रेशन (diwali celebration) पार्टीमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे हिने घातलेल्या एथनिक फेस्टिव्ह ड्रेसची चांगलीच चर्चा सुरू आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 05:37 PM2022-10-19T17:37:31+5:302022-10-19T17:38:12+5:30

Ananya Panday's Festive Ethnic Look: सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन सुरू झालं आहे. अशाच एका दिवाळी सेलिब्रेशन (diwali celebration) पार्टीमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे हिने घातलेल्या एथनिक फेस्टिव्ह ड्रेसची चांगलीच चर्चा सुरू आहे.

Actress Ananya Panday's festive ethnic dress worth Rs. 55K. look at her beautiful autfits | अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा

अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा

Highlightsअनन्याचा ड्रेस हा थ्री पीस कलेक्शन प्रकारातला होता आणि तो सेलिब्रिटी डिझायनर गोपी वैद यांनी डिझाईन केला होता.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे दिवाळीच्या फेस्टिव्ह वाईब्स (festive wibes) आता जाणवायला लागल्या आहेत. सर्वसामान्यांच्या घरात अजूनही दिवाळीची तयारी आणि खरेदीची धामधूम सुरू असली, तरी सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्ट्यांना मात्र दणक्यात सुरुवात झाली आहे. अनन्या पांडे ही देखील नुकतीच अशाच एका दिवाळी सेलिब्रेशन पार्टीसाठी गेली होती. यावेळी तिने घातलेल्या ५५ हजार रुपयांच्या ड्रेसची (Actress Ananya Panday's festive ethanic dress worth Rs. 55K) चांगलीच चर्चा साेशल मिडियावर व्हायरल झाली आहे. 

 

बॉलीवूडमधील अभिनेत्रींची सध्याची जी यंग ब्रिगेड आहे, तिच्यामधलं आघाडीचं नाव म्हणजे अनन्या पांडे. अनन्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त असून तिचा फॅशन सेन्सही उत्तम आहे.

दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच..

त्यामुळेच तिच्या वेगवेगळ्या आऊटफिट्सची चर्चा नेहमीच होत असते. आताही तिचा हा ड्रेस चांगलाच गाजतो आहे. बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी दिवाळीनिमित्त नुकत्याच एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. याच पार्टीसाठी अनन्याने या महागड्या ड्रेसची निवड केली होती.

 

कसा होता अनन्याचा ड्रेस?
अनन्याचा ड्रेस हा थ्री पीस कलेक्शन प्रकारातला होता आणि तो सेलिब्रिटी डिझायनर गोपी वैद यांनी डिझाईन केला होता. स्लिव्हलेस ब्रालेट प्रकारातलं ब्लाउज, शरारा प्रकारची पॅन्ट आणि त्यावर आकर्षक ओढणी असा अनन्याचा लूक होता.

पणत्यांमधून तेल गळू नये म्हणून २ सोपे उपाय, तेलाची बचत आणि फरशीही राहील स्वच्छ

ब्लाउज आणि पॅन्ट हे दोन्हीही प्रिंटेड सिल्क प्रकारातलं होतं. तसेच त्या दोन्हीवरही सिक्विन वर्क होतं. ब्लाउजवर मिरर वर्कही दिसून आलं. तर ओढणी ऑर्गेंझा प्रकारातली होती. तसंच ओढणीच्या बॉर्डरवर हलकी एम्ब्रॉयडरी आणि मिररवर्क केलेलं दिसून आलं. अनन्याने यावर गोल्डन रंगाचं हेवी चोकर, बांगड्या आणि कानात मोठे टॉप्स घातले होते. शिमरी- शायनी मेकअपमध्ये असलेली अनन्या अशा गेटअपमध्ये खरोखरच सुंदर दिसत होती. 

 

Web Title: Actress Ananya Panday's festive ethnic dress worth Rs. 55K. look at her beautiful autfits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.