Join us  

अंकिता लोखंडेचा परफेक्ट मराठी नवरी लूक;असा लूक हवा असेल तर करा 5 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 1:55 PM

Beauty tips: पिवळा आणि लाल या दोन रंगांचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली नऊवार साडी अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Actress Ankita Lokhande) नुकतीच नेसली होती. तिचा हा मराठमोळा अंदाज सोशल मिडियावर चांगलाचा व्हायरल (viral) झाला आहे. तिच्यासारखा मराठमोळा लूक हवा, तर या काही टिप्स (Beauty tips for perfect Marathi look) नक्कीच फॉलो करा...

ठळक मुद्देपरफेक्ट मराठमोळा लूक करण्याचा विचार असेल तर नक्कीच या काही टिप्स फॉलो करा!

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचं लग्न होऊन ८ ते १० दिवस उलटून गेले असले तरी अजूनही तिच्या लग्नातल्या साड्या, ड्रेसिंग यांची सॉलिड चर्चा सोशल मिडियावर (social media) सुरू आहे. अंकिताचा परफेक्ट जबरदस्त ड्रेसिंग सेन्स आणि ड्रेसेसचं सिलेक्शन तिच्या चाहत्यांना भारीच आवडलं असून आता तिच्या आणखी एका लूकची यात भर पडली आहे. अंकिताचा एक मराठमोळा लूक नुकताच (viral look of Actress Ankita Lokhande ) सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लग्नानंतर झालेल्या एका कार्यक्रमासाठी तिने ही पारंपरिक मराठी वेशभुषा केली होती. पिवळ्या रंगाचं नऊवार (9 yards nauwar saree), त्याचे लालबुंद काठ आणि तसाच त्यावर लालचुटूक रंगाचा शेला अशा थाटात अंकिता खूपच माेहक दिसत आहेत....

 

सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या, लेहेंगे, घागरे, वेस्टर्न गाऊन यांची जशी चलती आहे, तशीच चलती आणि तेवढीच डिमांड आपल्या नऊवार साडीलाही आहे. आजकाल मराठी नवरी तिच्या लग्नातल्या एखाद्या विधीसाठी हमखास नऊवार नेसतेच. नवरी सोबत तिच्या मैत्रिणी, करवल्या आणि नात्यातल्या महिलाही नऊवार नेसतातच. एखाद्या लग्नात किंवा तुमच्या स्वत:च्याच लग्नात जर तुमचा असा परफेक्ट मराठमोळा लूक (Beauty tips for perfect traditional Marathi look) करण्याचा विचार असेल तर नक्कीच या काही टिप्स फॉलो करा... असा जबरदस्त लूक होईल की बघणारे सगळेच म्हणतील आ... हा.... 

 

१. साडीचा रंग परफेक्ट हवा...नऊवार नेसून मराठी वेशभुषा करायचा विचार असेल तर साडीच्या रंगाचं सिलेक्शन तसंच हवं.. तुम्ही लेहेंगा किंवा घागरा घेताना एखादा फिकट रंग किंवा इंग्लिश रंग घेऊ शकता. पण नऊवार घ्यायची असेल तर तिचा रंग गर्द- गडदच हवा. लाल, हिरवा, पिवळा, जांभळा असे रंग नऊवार साडीत शोभून दिसतात. फिकट रंगाची नऊवार घेतली तर तुमचा अर्धा लूक तर तिथेच किल होऊन जातो. त्यामुळे रंगाचं सिलेक्शन करताना डार्क रंग घेण्यास प्राधान्य द्या.

 

२. ठसठशीत नथ आणि चंद्रकोरचंद्रकोर असणारी टिकली आणि मोत्याची नथ या दोन गोष्टींशिवाय मराठी लूक पुर्ण होतच नाही. त्यामुळे या दोन गोष्टी तुमच्या यादीत लगेचच ॲड करून टाका. पण या दोन गोष्टींची निवडही काळजीपुर्वक करा. कारण ठसठशीतपणा हा मराठी मेकअपचा मुळ बेस आहे. म्हणूनच तर नऊवारचा रंग डार्क असणं ज्याप्रमाणे गरजेचं आहे, त्याचप्रमाणे तुमची चंद्रकोरीची टिकली आणि तुमची नथ या दोन्ही गोष्टी ठसठशीत असाव्यात.

 

३. कानातल्या कुड्या आणि पारंपरिक दागिनेकोणत्याही प्रांताचा लूक करायचा असला तरी त्या प्रांतातले कपडे आणि त्या प्रांताचे दागिने या दोन्ही गोष्टी मस्ट आहेत. त्यामुळे मराठी लूक करतानाही दागिण्यांबाबत काळजी घ्या. मोत्याचे दागिने किंवा सोन्याचे, सोनेरी दागिने मराठी लूकसाठी छान दिसतात. मराठी लूक करायचा तर ठुशी, वज्रटीक, लक्ष्मीहार, पोहेहार त्याचप्रमाणे तन्मणी, चिंचपेटी हे मोत्याचे दागिने गळ्यात, हातात पाटल्या, तोडे तर कानात मोत्याच्या किंवा सोनेरी रंगातल्या कुड्या, बुगड्या असे मराठी थाटाचे दागिने तुमच्याकडे असले तर लूक अधिक परफेक्ट होईल. 

 

४. हातभर काचेच्या बांगड्यापाटल्या, बांगड्या, तोडे किंवा मोत्याच्या मोठ्या बांगड्या हातात घातल्या तरी जोपर्यंत तुम्ही हातभर काचेच्या बांगड्या घालत नाही, तोपर्यंत तुमचा मराठी लूक अधिक खुलून दिसणार नाही. त्यामुळे तुमच्या साडीला मॅच होतील, अशा काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. जर साडीला मॅचिंग असणाऱ्या काचेच्या बांगड्या मिळाल्या नाहीत, तर हिरव्या किंवा लाल यापैकी कोणत्याही बांगड्या घातल्या तरी चालेल. 

 

५. असा असावा मेकअपनऊवार साडीतलं मराठमोळं ड्रेसिंग करायचं असल्यास नॅचरल लुक असलेला मेकअप करावा. नऊवारवर सोनेरी बुटी असते तसेच दागिनेही सोनेरी असतात. त्यामुळे मेकअप गोल्डन थीमचा आणि वॉटरप्रुफ असावा. लिपस्टिक लावतानाही खूप वेगळे रंग ट्राय करणं टाळा. गुलाबी, मरून, चाॅकलेटी, लाल या शेडच्या लिपस्टिक शक्यतो लावा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्समराठीअंकिता लोखंडे