अशक्तपणा, पाणी कमी प्यायल्यामुळे त्वचेचं होणारं डिहायड्रेशन, खूप जास्त ताण किंवा थकवा, जास्त वेळ स्क्रिन बघणे किंवा मग शरीरात पोषणमुल्यांची असणारी कमतरता यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circles) येण्याचा त्रास अनेक जणींना जाणवतो. ज्यांना डोळे सारखं चोळण्याची सवय असते, त्यांच्याही डोळ्यांखाली काळी वर्तूळे दिसू लागतात. ती कमी करण्यासाठी आहार चांगला घेणं तर गरजेचं आहेच, पण त्यासोबतच काही बाह्य उपचार (Home Remedies shared by Juhi Parmar) करणंही गरजेचं आहे.
कारण बऱ्याचदा आपण त्वचेला जे काही लावतो, त्यातून त्वचेला चांगलं पोषण मिळतं. म्हणूनच डोळ्यांभाेवती असणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अभिनेत्री जुही परमार हिने सुचवलेला एक सोपा उपाय करून बघा.
५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर- डिझायनर काळी साडी, बघा स्वस्तात मस्त ३ पर्याय
जुही सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. त्यावर ती तिच्या चाहत्यांसाठी अनेकदा वेगवेगळ्या ब्यूटी टिप्स शेअर करत असते. यामध्ये महागडे कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा सौंदर्य खुलविण्यासाठी घरगुती उपचार कसे करता येतील, यावर तिचा भर असतो. आता तिने या नव्या वर्षातलं तिचं पहिलं ब्यूटी सिक्रेट नुकतंच शेअर केलं असून डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी एक उपाय सुचविला आहे.
डार्क सर्कल्स कमी करण्याचा घरगुती उपाय
साहित्य
१ टीस्पून बदामाचं तेल
१ टीस्पून बटाट्याचा रस
ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी
१ टीस्पून कॉफी पावडर
चिमुटभर हळद
कृती
१. वरील सगळं साहित्य एका वाटीमध्ये घेऊन व्यवस्थित एकत्र करा.
२. हा लेप आता बोटाने डोळ्यांभोवती लावून हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मालिश करा.
मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन
३. खूप जोरजाेरात चोळू नये.
४. मालिश करून झाल्यानंतर साधारण ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.