केसांचं आरोग्य चांगलं असल्यास केस सुंदर दिसतीलच. पण केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन केवळ केसांच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळे केस सुंदर करण्याचे प्रोडक्टस बाजारात शोधले जातात. केमिकलयुक्त प्रोडक्टस वापरल्यानं केस तात्पुरते सुंदर दिसतात पण त्याचे केसांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. म्हणूनच केसांच्या समस्यांवर योग्य औषध शोधून उपाय केल्यास समस्या सुटतात आणि केसही सुंदर दिसतात. हेअर केअर प्रोडक्टसच्या गर्दीत घरगुती उपायांकडे लक्ष जात नाही. पण केसांच्या समस्यांवर घरगुती उपाय उपलब्ध आहेत. याच घरगुती उपायाकडे टी.व्ही अभिनेत्री जुही परमारनं लक्ष वेधलं आहे.
Image: Google
अभिनेत्री जुही परमार इन्स्टाग्रामवर ब्यूटी आणि फिटनेसबद्दल पोस्ट शेअर करत असते. तिच्या माहितीपूर्ण पोस्टमध्ये घरगुती उपायांबद्दल सांगितलेलं असतं. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये जुहीनं केस सुंदर होण्यासाठी केसांच्या समस्यांवर घरगुती उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.
आधी केसांच्या समस्या दूर केल्या तर केस सुंदर होतील या नियमानं जुहीनं हा उपाय सांगितला आहे. केसांचे लाड केले, त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष देत त्यांना काय हवं नको ते बघितलं तर केस नक्कीच चांगले होतील असं जुही म्हणते.
Image: Google
केसांमध्ये कोंडा असल्यास, केस रुक्ष असल्यास ते तुटतात, गळतात. केसांवरची चमक हरवते. केसांच्या समस्या सोडवून केस सुंदर करण्यासाठी जुहीनं एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय आणि या उपायाचे फायदे याबाबत आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून जुहीनं सविस्तर माहीती सांगितली आहे. सुंदर केसांसाठी जुही मेथ्यांचा उपाय सांगते. मेथ्यांचा उपाय करण्यासाठी एक कप पाण्यात 1 चमच्या मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्यावं. मेथ्या बाजूला ठेवाव्यात. पाणी स्प्रे बाॅटलमध्ये भरावं.. केसांच्या लांबीनुसार हे प्रमाण कमी जास्त करता येते.
केस विंचरुन घ्यावेत. केसांमध्ये मेथ्याचं पाणी स्प्रे करावं. बोटांनी केसांच्या मुळांशी हलका मसाज करावा. 15 ते 20 मिनिटानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत.
Image: Google
केसांसाठी मेथ्या फायदेशीर कशा?
1. मेथ्यांमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रथिनं असतात. या दोन घटकांमुळे केसांचं पोषण होतं.
2. केस निरोगी आणि मजबूत होण्यासठी मेथ्यांमधील लेसिथिन नावाचा घटक फायदेशीर ठरतो.
3. मेथ्यांमधील ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मांमूळे केसांच्या मुळांशी आर्द्रता निर्माण होते.