Join us  

अभिनेत्री जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, सुंदर त्वचेसाठी जुही सांगते एक सोपा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2022 5:02 PM

Skin Care Tips: कुमकुम या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar's beauty secret) हिने त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे.

ठळक मुद्देआठवड्यातून फक्त एकदा हा उपाय केला तरी आठवडाभर फ्रेश रहाल, असं ती सांगते आहे. 

जुही परमार (Juhi Parmar) म्हणजे छोट्या पडद्यावरचं एक मोठं नाव. काही वर्षांपुर्वी टीव्हीवर कुमकुम नावाची मालिका आली आणि त्यात मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री जुही परमार घराघरात पोहोचली. मालिकेला एवढी वर्षे उलटून गेली तरीही जुहीची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. जुही सोशल मिडियावरही बरीच ॲक्टीव्ह असते आणि तिच्या चाहत्यांसोबत काही खास ब्यूटी टिप्सही नेहमीच शेअर करत असते. आता जुहीने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून त्यामध्ये तिने त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी (beauty secret for glowing skin) एक सोपा घरगुती उपाय (Home remedies for flawless skin) सांगितला आहे. 

 

ही पोस्ट शेअर करताना जुही म्हणते आहे की आपल्या स्वयंपाक घरात अनेक जादुई पदार्थ असतात. हे पदार्थ आपल्या त्वचेसाठी किती लाभदायक ठरतात, याची माहिती आपल्याला नसतेच.

 

 

'साडी विथ जॅकेट', नवा स्टायलिश ट्रेण्ड! यंदा लग्नसराईत दिसा स्पेशल, निवडा आपल्या साडीवर खास जॅकेट

त्यामुळे आता जेव्हा केव्हा तुम्ही भात करण्यासाठी तांदूळ काढाल,  तेव्हा तुमच्या त्वचेसाठीही त्याचा उपयोग करून घ्यायला विसरू नका. तांदळाच्या पाण्याचाच एक खास उपयोग जुहीने तिच्या  व्हिडिओमध्ये शेअर केला असून तांदळाचं पाणी म्हणजे तुमच्या त्वचेसाठी खरोखरच एक जादू आहे, असंही ती म्हणते आहे. 

 

त्वचेच्या सौंदर्यासाठी जुहीने सांगितलेला उपाय१. या व्हिडिओमध्ये जुहीने असं सांगितलं आहे की एक ते दोन टेबलस्पून तांदूळ घ्या.

२. ते तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

स्वयंपाक करताना तुम्हीही ३ चुका करता का? अन्नातले पौष्टिक घटकच वाया जातात.. पाहा काय चुकतंय?

३. त्यानंतर त्यात ४ ते ५ टेबलस्पून पाणी टाका आणि एखादा तास तांदूळ त्या पाण्यात भिजू द्या.

४. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

५. हे पाणी दिवसांतून एक किंवा दोन वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावा. एखाद्या टोनरप्रमाणे ते तुमच्या त्वचेची काळजी घेतं आणि त्वचेची चमक आणखी खुलवतं.

६. आठवड्यातून फक्त एकदा हा उपाय केला तरी आठवडाभर फ्रेश रहाल, असं ती सांगते आहे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी