Lokmat Sakhi >Beauty > जुही परमार सांगतेय चेहऱ्याला इंस्टंट ग्लो मिळवून देणारा खास उपाय- ५ मिनिटांत चेहरा चमकेल

जुही परमार सांगतेय चेहऱ्याला इंस्टंट ग्लो मिळवून देणारा खास उपाय- ५ मिनिटांत चेहरा चमकेल

Beauty Tips By Actress Juhi Parmar: लक्ष्मीपुजनासाठी तयार होण्याआधी हा ५ मिनिटांचा एक झटपट उपाय करा... बघा संध्याकाळी चेहऱ्यावर कसा मस्त ग्लो येईल (how to get instant glowing skin?).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2023 09:10 AM2023-11-12T09:10:09+5:302023-11-12T09:15:01+5:30

Beauty Tips By Actress Juhi Parmar: लक्ष्मीपुजनासाठी तयार होण्याआधी हा ५ मिनिटांचा एक झटपट उपाय करा... बघा संध्याकाळी चेहऱ्यावर कसा मस्त ग्लो येईल (how to get instant glowing skin?).

Actress Juhi Parmar's beauty secret for instant glowing skin, Home remedies for radiant skin  | जुही परमार सांगतेय चेहऱ्याला इंस्टंट ग्लो मिळवून देणारा खास उपाय- ५ मिनिटांत चेहरा चमकेल

जुही परमार सांगतेय चेहऱ्याला इंस्टंट ग्लो मिळवून देणारा खास उपाय- ५ मिनिटांत चेहरा चमकेल

Highlightsथकलेल्या चेहऱ्याला पुन्हा तरतरी आणण्यासाठी आणि त्यावर छानसा फेस्टिव्ह ग्लो येण्यासाठी हा ५ मिनिटांचा एक सोपा उपाय करा.

दिवाळीसाठी आपण फेशियल, क्लिनअप असं सगळं केलेलं असतं. पण नेमकं लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अभ्यंगस्नान त्यानंतर फराळाची, जेवणाची लगबग असं सगळं सुरू होतं. एकानंतर एक कामं करून झाल्यावर थकवा येतो आणि तो थकवा चेहऱ्यावरही जाणवू लागतो. मग फेशियल- क्लिनअप केलेला चेहराही त्यामुळे थकल्यासारखा दिसू लागतो. म्हणूनच या थकलेल्या चेहऱ्याला पुन्हा तरतरी आणण्यासाठी आणि त्यावर छानसा फेस्टिव्ह ग्लो येण्यासाठी हा ५ मिनिटांचा एक सोपा उपाय करा. हा उपाय अभिनेत्री जुही परमार हिने शेअर केला आहे.(Actress Juhi Parmar's beauty secret for instant glowing skin)

 

इंन्टंट ग्लो येण्यासाठी सोपा उपाय

१. हा उपाय अतिशय सोपा असून यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ लागणार आहेत. 

दिवाळीत कसा लूक कराल? बघा 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची सुंदर स्टाईल- आकर्षक दिसाल

२. सगळ्यात आधी २ चमचे तांदळाचं पीठ,  १ टीस्पून मध आणि २ टेबलस्पून थंड दूध एका वाटीत एकत्र करा. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने एखादा मिनिट चेहऱ्याला मसाज करा. नंतर साधारण ४ ते ५ मिनिटांनी लेप सुकत आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.

 

३. यानंतर चेहरा माॅईश्चराईज करा. बघा चेहऱ्यावर कसा मस्त ग्लो येईल.

दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

४. तांदळाच्या पीठामुळे त्वचा स्वच्छ होण्यास तसेच त्वचेवरचे बंद असलेले स्किन पोअर्स ओपन होण्यास मदत होते. स्किन रिपेअरिंग मास्क म्हणून तांदळाचं पीठ ओळखलं जातं. मधामुळे त्वचा छान हायड्रेटेड होते तसेच मऊ होऊन तिच्यावर ग्लो येतो. तर दुधामुळे त्वचेवरचं टॅनिंग निघून जाऊन स्किन टोन सुधारण्यास मदत होते.  


 

Web Title: Actress Juhi Parmar's beauty secret for instant glowing skin, Home remedies for radiant skin 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.