Celebrity Beauty Hacks: उन्हाचा पारा जसजसा वाढतो, तसतसं शरीरातील पाणी कमी होऊ लागतं. शरीरात जर पाणी कमी झालं तर याचा प्रभाव त्वचेवरही दिसू लागतो. चेहरा कोरडा पडतो आणि त्वचेची कोमलताही दूर होते. चेहऱ्याची ड्रायनेस वाढली तर चेहरा निर्जीवही दिसतो किंवा त्यावर पांढऱ्या लाइन्सही दिसू लागतात. तुम्हाला सुद्धा ही समस्या होत असेल तर अभिनेत्री करिश्मा तन्नाची ही ट्रिक तुमच्या कामी पडू शकते. करिश्मानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ड्राय स्किनची समस्या दूर करण्याचा एक उपाय सांगितला आहे.
काय आहे करिश्माचा उपाय?
अभिनेत्री करिश्मा तन्नानं सांगितलं की, जर या दिवसांमध्ये तुमची स्किन जास्तच ड्राय झाली असेल किंवा रखरखीत झाली असेल तर मॉइश्चरायजर चेहऱ्यावर केवळ क्रीमसारखं लावू नका. याचा एक जाड थर फेस मास्कसारखा थर चेहऱ्यावर लावा. काही वेळ हे चेहऱ्यावर तसंच ठेवा आणि नंतर चेहऱ्यावर मालिश करा. यानं स्किनची ड्रायनेस कमी होईल.
ड्राय स्कीनमध्ये इतर काही उपाय
ज्यांची स्किन नेहमीच ड्राय राहते अशांनी रात्री झोपताना चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावावं. खोबऱ्याच्या तेलानं स्किनवर एक सुरक्षित थर तयार होतो. ज्यामुळे स्किनची ड्रायनेस कमी होते.
तसेच मध चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवल्यासही स्किनची ड्रायनेस कमी होईल आणि स्कीनवर एक वेगळाच ग्लो येईल. तसेच मधातील पोषक तत्वही स्किनमध्ये मुरतील. मध चेहऱ्यावर थेट लावू शकता किंवा दुधात मिक्स करूनही लावू शकता.
उन्हाळ्यात ड्राय आणि खाज असलेल्या स्कीनवर काकडीचा लावणंही फायदेशीर ठरेल. काकडीच्या रसानं स्किनला हायड्रेशन मिळतं आणि ज्यामुळे स्किन मुलायम होते.
ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केळ्याचा फेसपॅक लावू शकता. केळ बारीक करून त्यात मध टाका आणि हे चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर धुवून घ्या.