Lokmat Sakhi >Beauty > कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत! कतरिना म्हणते, मी कधीच लिपस्टिक ओठांवर.....

कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत! कतरिना म्हणते, मी कधीच लिपस्टिक ओठांवर.....

Katrina Kaif Shared Her Unique Style Of Applying Lipstick: कतरिना कैफने मेकअप आणि खास करून तिची लिपस्टिक लावण्याची पद्धत याविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत... (actress Katrina Kaif shared her makeup tips)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 01:04 PM2024-09-25T13:04:51+5:302024-09-25T17:12:16+5:30

Katrina Kaif Shared Her Unique Style Of Applying Lipstick: कतरिना कैफने मेकअप आणि खास करून तिची लिपस्टिक लावण्याची पद्धत याविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत... (actress Katrina Kaif shared her makeup tips)

actress katrina kaif shared her makeup tips, katrina kaif shared her unique style of applying lipstick | कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत! कतरिना म्हणते, मी कधीच लिपस्टिक ओठांवर.....

कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत! कतरिना म्हणते, मी कधीच लिपस्टिक ओठांवर.....

Highlightsयामुळे ओठांवर एक चमक येते आणि ते माॅईश्चराईज दिसतात. कतरिना सांगतेय त्या पद्धतीने एकदा लिपस्टिक लावून पाहायला हरकत नाही. 

सेलिब्रिटी कशा पद्धतीचा मेकअप करतात, ते काेणते कॉस्मेटिक्स वापरतात किंवा मग त्वचेचे, केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करवून घेतात, याविषयी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सूकता असते. आता तुम्हाला जर अभिनेत्री कतरिना कैफ हिची स्टाईल, तिचा मेकअप आवडत असेल तर ती नेमकी कशा पद्धतीने मेकअप करते ते पाहा (actress Katrina Kaif shared her makeup tips). अमेरिकन मेकअप आर्टिस्ट हुडा कट्टान यांनी कतरिना कैफची काही दिवसांपुर्वी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान कतरिनाने तिच्या मेकअपच्या आवडीविषयी अनेक किस्से सांगितली असून तिची लिपस्टिक लावण्याची खास पद्धतही शेअर केली आहे...(Katrina Kaif Shared Her Unique Style Of Applying Lipstick)

 

कतरिनाला लहानपणापासूनच होतं मेकअपचं वेड

बहुसंख्य शाळकरी मुलींना मेकअपचं आकर्षण असतं. आईचे किंवा ताईचे वेगवेगळे मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे आणि गुपचूप ते लावून बघायचे, अशी हौस बऱ्याच जणींना असते. तशीच मेकअपची हौस कतरिनालाही होती. तिला मेकअप करायला खूप आवडायचं. ती म्हणते की मी लहानपणी खूप जास्त लाजाळू होते.

बाजारातून विकत आणलेली फुलं आठवडाभर राहतील फ्रेश- टवटवीत, २ खास टिप्स-फुलं कोमेजणार नाहीत..

हळूहळू टीनएज झाल्यानंतर मी स्वत:चा मेकअप करायला लागले. त्यानंतर मग आपोआपच मेकअप करून वावरायला लागल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स वाटायचा. मी बऱ्याच जणांना मेकअप करताना बारबाईने पाहायचे आणि त्यांना त्याविषयी बरेच प्रश्न विचारायचे. हे अमूक प्रोडक्ट का लावलं, त्याचा काय उपयोग होतो, ते कशा पद्धतीने लावलं तर चेहऱ्यात काय बदल दिसतो.. हळूहळू अशी बरीच माहिती गोळा केली आणि मग मी माझा स्वत:चा मला जसा पाहिजे तसा एक्स्प्रेसिव्ह मेकअप करायला लागले...

 

कतरिनाची लिपस्टिक लावण्याची खास पद्धत

लिपस्टिक लावणे हा आता बहुसंख्य जणींच्या रोजच्या मेकअपचा एक भाग आहे. ऑफिससाठी बाहेर पडताना किंवा कॅज्युअली कुठेही बाहेर जाताना बहुसंख्य जणी लिपस्टिक लावतातच. आता तुम्हाला जर कतरिनाप्रमाणे मॉईश्चराईज ओठ आवडत असतील तर तिची ही लिपस्टिक लावण्याची खास पद्धत ट्राय करून पाहा.

पंचपाळ्यातले हळदी- कुंकू ओलसर होऊन हळदीत किडे होतात? १ उपाय- त्यांचा रंगही राहील फ्रेश

कतरिना म्हणते की मी लिपस्टिक लावताना ती कधीच ओठांवर थेट लावत नाही. आधी एका ब्रशवर लिपस्टिक घेते. त्यानंतर ती लिपबाममध्ये व्यवस्थित ब्लेंड करते आणि त्यानंतरच ती ओठांवर लावते. यामुळे ओठांवर एक चमक येते आणि ते माॅईश्चराईज दिसतात. कतरिना सांगतेय त्या पद्धतीने एकदा लिपस्टिक लावून पाहायला हरकत नाही. 


 

Web Title: actress katrina kaif shared her makeup tips, katrina kaif shared her unique style of applying lipstick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.