सर्वसामान्यांची दिवाळी आजपासून सुरु झाली असली, तरी बॉलीवूड सेलिब्रिटींचे दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebration) मात्र मागच्या काही दिवसांपासूनच दणक्यात सुरू आहे. अभिनेता आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप यांच्या नंतर सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा यानेही एक जबरदस्त दिवाळी पार्टी होस्ट केली होती. त्यामुळे या पार्टीत नटून- थटून सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींचे दिवाळी फेस्टिव्ह लूक (festive look of bollywood celebrities) सध्या व्हायरल होत आहे. यापैकीच एक आहे अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif's Diwali Look). कतरिनाने नेसलेली लाल रंगाची चमचमती साडी अनेक जणींना भलतीच आवडली आहे.
कशी आहे कतरिनाची साडी?
कतरिनाने तिचे या लाल साडीतले काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामला शेअर केले होते. लाल रंगाच्या या साडीमध्ये कतरिना खरोखरच आकर्षक दिसत आहे. तिच्या या साडीचा रंग लाल असला तरी सौम्य प्रकारातला आहे.
दिवाळीची साफसफाई करायची, खिडक्या पुसायच्या म्हणून बाई पाहा कुठं पोहचल्या.. व्हिडिओ व्हायरल
बऱ्याचदा लाल रंगाचे कपडे अंगावर खूपच ब्राईट दिसतात. त्यामुळे मग ते घालावे की नाही, असा प्रश्न पडतो. पण कतरिनाची साडी मात्र एकदम सोबर प्रकारातली आहे. साडीचा कपडा क्रेप प्रकारातला असून त्यावर गोल्डन धाग्यांनी बुट्टी वर्क करण्यात आले आहे. तसेच काठांवर गोल्डन धाग्यांमधलीच टेंपल बॉर्डर आहे.
साडी आणि ब्लाऊज असे दोन्हीही एकाच रंगसंगतीतले आणि एकाच प्रकारच्या कपड्यातले आहेत. पण असा माेनोटोनस लूक असला तरी तो कतरिनाला शोभून दिसतो आहे.
अरे देवा, महाराजा भोग थाळी खायची म्हणून खर्च केले ९ लाख रुपये... ताईंचे चुकले कुठे?
कतरिनाची ही साडी फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधली असून साडीची किंमत तब्बल ७० हजार रुपये एवढी आहे. साडीवर मॅच होण्यासाठी कानात मोठे झुमके आणि कपाळावर नाजूक टिकली, एवढ्याच ॲक्सेसरीज कतरिनाने घातल्या आहेत.