Join us  

क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट- हिवाळ्यात तिच्यासारखी चमकदार त्वचा मिळविण्यासाठी बघा काय करायचं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2023 9:17 AM

Actress Kriti Sanon Shared Her Beauty Secret: क्रिती सेनन तिच्या त्वचेची कशी काळजी घेते, याविषयीचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

ठळक मुद्देत्वचेसाठी एवढी सगळी काळजी घेते, म्हणूनच तर क्रितीची त्वचा एवढी छान आहे.... बघा आता यापैकी काय काय करणं तुम्हाला शक्य आहे... 

हिवाळ्यात थंड- कोरड्या हवेमुळे त्वचेची समस्या खूप जास्त वाढलेली असते. अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न पडतोच. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर दिलं आहे अभिनेत्री क्रिती सेनन हिने. हिवाळा असूनही तिची  त्वचा  कशी छान मॉईश्चराईज आणि चमकदार दिसते (Actress Kriti Sanon shared her beauty secret). अशी त्वचा मिळविण्यासाठी ती काय करते, त्वचेची कशी काळजी घेते, कोणकोणते कॉस्मेटिक्स वापरते, याविषयीची माहिती तिने नुकतीच एका इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. (Kriti Sanon's winter skincare routine)

 

क्रिती सेननचं स्किन केअर रुटीन

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची, याबाबत क्रिती ने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यानुसार तर सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवनू घ्या. त्यासाठी एखादं सॉफ्ट क्लिन्झर वापरावं.

चष्मा असो की नसो- मुलांना ५ पदार्थ खायला द्या- डोळ्यांची ताकद वाढेल, नजर होईल तेज

यानंतर त्वचेला टोनर लावावं. यासाठी ती गुलाबपाणी आणि ग्लिसरीन लावते, असं तिने सांगितलं आहे.

या स्टेपनंतर तिसरी स्टेप म्हणजे त्वचेला ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेले सेरम लावावे..

 

यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे चेहऱ्याला BCC म्हणजेच Barrier Care Cream लावावे. 

चेहऱ्याला एखादं फेस ऑईल लावण्याचा सल्लाही तिने दिला आहे. पण हा पर्याय ऑप्शनल आहे, असं ती सुचवते. हे फेस ऑईल मात्र non-comedogenic या प्रकारातलं असावं, असंही तिने सांगितलं. 

गोल्ड फेशियलसारखा ग्लो देणारा सोपा घरगुती उपाय, बघा 'या' चमचाभर पावडरची कमाल

भुवयांसाठी आणि डोळ्यांच्या पापण्यांसाठी तिने कॅस्टर ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल हे दोन्ही एकत्र करून लावावं, असा सल्ला दिला आहे.

त्यानंतर सगळ्यात शेवटी एखादा छानसा लिपबाम लावा, जो तुमच्या ओठांना मऊ आणि गुलाबी ठेवेल.

त्वचेसाठी एवढी सगळी काळजी घेते, म्हणूनच तर क्रितीची त्वचा एवढी छान आहे.... बघा आता यापैकी काय काय करणं तुम्हाला शक्य आहे... 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीक्रिती सनॉनथंडीत त्वचेची काळजी