मालविका मोहनन.. दक्षिणेतली एक गुणी अभिनेत्री म्हणून मालविका ओळखली जाते. तिच्या अदा, तिची स्टाईल, ड्रेसिंग सेन्स, फॅशन आणि तिचा अभिनय.. यांची नेहमीच चर्चा असते.. सध्या अशीच चर्चा रंगली आहे ती मालविकाच्या साडीची.. तिची चमकदार पिवळ्या रंगाची साडी तिचं सौंदर्य खुलविणारी ठरली आहे...
नुकताच संक्रांतीचा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. तमिळी संस्कृतीनुसार मालविकाने पोंगल साजरा केला. पोंगल सणाच्या दिवशी तिने पारंपरिक वेशभुषा करत ही पिवळी धमक साडी नेसली होती. पिवळी साडी, लाल काठ आणि त्यावर साडीच्याच रंगाचं सॅटीन ब्लाऊज अशा सोज्वळ अवतारातली मालविका नेटकरींना भलतीच आवडली आहे..
मालविकाची ही साडी लिनन प्रकारातली आहे. साडीच्या काठांना लालसर रंगाची सॅटीन लेस लावण्यात आली आहे. साडीवरचं ब्लाऊजदेखील सॅटीन प्रकारातलं असून ब्लाऊजलाही लाल रंगाची बॉर्डर आहे. Anavila या ब्रॅण्डची ही साडी असून साडीची किंमत तब्बल २२ हजार रूपये आहे. साडी पुर्णपणे प्लेन असूनही मालविकाचा लूक अतिशय कॅची झाला आहे. सोनेरी रंगाचे दागिने, मोठी टिकली आणि मोकळे सोडलेले केस मालविकाचा इथनिक लूक कम्प्लिट करणारे ठरले आहेत...
लिनन साडीविषयी वाचा या इंटरेस्टिंग गोष्टी...
Interesting things about linen
- आजकाल लिनन साड्यांची क्रेझ चांगलीच वाढत चालली आहे. ऑफिस, पार्टी यासाठी तर लिनन साडी विशेष भाव खाऊन जाणारी ठरते आहे. अशा या लिनन कपड्याचे मुळ उगमस्थान इजिप्त आहे, असे मानले जाते.
- कॉटनपेक्षाही लिनन कपडा अतिशय मऊ, तलम आणि चटकन सुकणारा असतो. त्यामुळे उन्हाळ्यासाठी लिननचा कपडा अतिशय उत्तम मानला जातो.
- प्राचीन काळी इजिप्तमध्ये राज घराण्यातील लोक लिनन कपड्याचा वापर करायचे.
- कॉटन किंवा इतर कोणत्याही फॅब्रिकपेक्षा लिननचे फॅब्रिक काढणे अवघड असते, असे म्हणतात.
- व्यापाऱ्यांसोबत मुळचा इजिप्तचा असणारा लिनन कपडा कालांतराने ब्रिटनमध्ये गेल्या. ब्रिटनमधून काही इंग्रज अधिकाऱ्यांनी तो त्यांच्यासाेबत भारतात आणला. बडे बडे इंग्रज अधिकारी लिनन कपडा वापरायचे. त्यामुळे त्यांच्या गरजेपोटी मग भारतात लिनन कपड्याची निर्मिती होण्यास सुरुवात झाली.
- लिनन हे एक बास्ट फायबर आहे. म्हणजेच ते वनस्पतींच्या सालाच्या सगळ्यात आतील भागातून काढले जाते. म्हणूनच इतर कोणत्याही कपड्यापेक्षा लिननची tensile strength ही सगळ्यात जास्त मानली जाते. त्यामुळेच लिनन कपडा हा महागडा असतो.
- लिनन कपडा हा मऊ, तलम असतो, पण तो अतिशय मजबूत आणि दणकटही असतो. त्यामुळे जगभरातील गारमेंट इंडस्ट्रीमध्ये लिनन कपड्याचा आता सर्रास वापर होतो.