Lokmat Sakhi >Beauty > कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप

कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप

Actress Priyanka Chopra reveals her makeup secret: बॉलीवूड- हॉलीवूडची स्टनिंग ब्यूटी प्रियांका चोप्रा सांगतेय तिचं ब्यूटी- मेकअप सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 03:07 PM2023-10-27T15:07:06+5:302023-10-27T15:08:04+5:30

Actress Priyanka Chopra reveals her makeup secret: बॉलीवूड- हॉलीवूडची स्टनिंग ब्यूटी प्रियांका चोप्रा सांगतेय तिचं ब्यूटी- मेकअप सिक्रेट...

Actress Priyanka Chopra reveals her makeup secret, says she gets ready in 10 minutes if not going for shoot | कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप

कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप

Highlightsप्रियांकासारखी अभिनेत्री १० मिनिटांत तयार होत असेल, याचंच खरंतर आश्चर्य वाटतं. पण तिनेच People Magazine यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्या साध्या- सोप्या मेकअपबद्दल सांगितलं आहे.

घरातून बाहेर पडायचं म्हटलं आणि ते ही एखाद्या कार्यक्रमाला जायचं असलं की हमखास उशीर होतोच. आणि पुरुष मंडळी त्या उशीर होण्याचं कारण सरळ घरातल्या बायकांच्या माथी फोडतात. महिलांना मेकअप करायला किती वेळ लागतो आणि त्यामुळे मग कुठेही बाहेर जायचं असलं तरी कसा उशीर होतो, याची खुमासदार चर्चा बऱ्याचदा पुरुषांमध्ये रंगलेली असते. आता सामान्य महिलांचं असं असेल तर अभिनेत्रींची तर गोष्टच वेगळी... असं कुणालाही वाटू शकतं. तसं असेलही कदाचित, पण आपली प्रियांका चोप्रा मात्र याला अपवाद आहे बरं का (Actress Priyanka Chopra reveals her makeup secret).. एका मुलाखतीत तिने असं नुकतंच सांगितलंय की तिला जेव्हा कॅमेरासमोर जायचं नसतं, तेव्हा ती अवघ्या १० मिनिटांत तयार होते (Priyanka Chopra gets ready in 10 minutes for any program)

 

प्रियांकासारखी अभिनेत्री १० मिनिटांत तयार होत असेल, याचंच खरंतर आश्चर्य वाटतं. पण तिनेच People Magazine यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्या साध्या- सोप्या मेकअपबद्दल सांगितलं आहे.

'असा' चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे, चहा करताना आणि पिताना फक्त १ गोष्ट लक्षात ठेवा

प्रियांका म्हणते की तिला जेव्हा कुठे शुटिंगला जायचं नसतं, त्यावेळी ती १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मेकअपसाठी बसूच शकत नाही. फटाफट मेकअप करून झटपट ती तयार होते. असा सुपरफास्ट मेकअप करण्यासाठी ती नेमकं काय करते याविषयी ती सांगते की अशावेळी ती मेकअप बेस करत बसत नाही. त्यामुळे तिचा खूप वेळ वाचतो. शिवाय मेकअप करताना तिचा मुख्य भर डोळे आणि ओठ यांच्या मेकअपवर असतो. 

 

त्यामुळे ती मस्कारा आठवणीने न चुकता नेहमीच लावते. शिवाय लिपस्टिकही ग्लॉसी, बोल्ड शेडची निवडते. कारण बाकीचा काहीच मेकअप नसल्याने आकर्षक लूक येण्यासाठी या दोन गोष्टींवर फोकस करणे गरजेचेच आहे.

सिल्क असो की शिफॉन सगळ्या साड्यांवर चालतील असे फॅशनेबल ब्लाऊजचे ३ पर्याय, रेडिमेड आणि आकर्षक

बघा तुम्हीही प्रियांकाचं हे मेकअप सिक्रेट कधी तरी ट्राय करून पाहू शकता. माॅईश्चरायझर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट आणि त्यानंतर थेट मस्कारा किंवा आय लायनर आणि लिपस्टिक एवढं केलं तरी नक्कीच छान लूक मिळू शकतो. 

 

Web Title: Actress Priyanka Chopra reveals her makeup secret, says she gets ready in 10 minutes if not going for shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.