Join us  

३ गोष्टींमुळे रेखा अजूनही दिसते देखणी! सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बघा त्यांचं रुटिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 11:27 AM

Actress Rekha Shared Her Beauty Secret: तरुणपणी रेखा यांनी काही गोष्टी नियमितपणे केल्या. त्यामुळेच आज त्यांचं सौंदर्य टिकून आहे...(Rekha performs these beauty rituals for glowing skin at 70)

ठळक मुद्दे रेखा यांनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणी त्या त्वचेसाठी साबणाऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ आणि तेल यांचं एकत्रित मिश्रण वापरायच्या.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं सौंदर्य आजही अनेकांना भुरळ घालणारं आहे. तरुणपणी तर त्यांचे कित्येक चाहते होतेच.. पण वाढत्या वयासोबत त्यांचे चाहतेही वाढत आहेत, ही खरी त्यांच्या सौंदर्याची गंमत आहे. वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक दिसते ती पाहून तर अनेकी तरुणीही लाजतात. म्हणूनच तर या वयातही रेखा यांनी त्यांचं सौंदर्य कसं जाेपासलं आहे, नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे त्यांंची त्वचा आजही एवढी सुंदर, चमकदार आणि विशेष म्हणजे तरुण टवटवीत कशी दिसते, असा प्रश्न अनेकींना पडतो (Rekha shared her beauty secret). तुम्हीही त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असाल तर त्याविषयी त्यांनी स्वत:च दिलेली ही माहिती एकदा बघा..(Rekha performs these beauty rituals for glowing skin at 70)

 

रेखा यांच्या सौंदर्याचं सिक्रेट नेमकं काय?

काही वर्षांपुर्वी Asia Spa India यांनी रेखा यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांना त्यांच्या सौंदर्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रेखा यांनी दिलेली माहिती सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. 

ऋजुता दिवेकर म्हणतात दिवाळीत 'कॅलरी'वाली नाही, 'कहानी'वाली मिठाई खा... म्हणजे नेमकं काय?  

ब्यूटी टिप्स देताना रेखा म्हणाल्या होत्या की चांगली त्वचा असणं हे बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक असलं तरी काही गोष्टींच्या मदतीने आपण सौंदर्य नक्कीच टिकवून ठेवू शकतो. त्यापैकी त्या करतात ती पहिली गोष्ट म्हणजे दररोज संध्याकाळी ७: ३० च्या आधी जेवण करणे. कारण त्यानंतर तुम्ही जे काही खाल ते सगळं पचेलच असं नाही. जेवण, योगा, व्यायाम हे सगळं शांततेत आणि वेळ राखून करा. या गोष्टी कधीही गडबडीत उरकण्याचा प्रयत्न करू नका. 

 

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे दररोज भरपूर पाणी प्या. पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यामुळे शरीर आपोआपच डिटॉक्स व्हायला मदत होते. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ शरीराबाहेर जाऊन शरीर आतून शुद्ध होते. त्याशिवाय दररोज पुरेशी झोप घ्या. सातत्याने अपुरी झोप होत असेल तर तुमचं शरीर लवकर थकतं. त्याचा परिणाम त्वचेवरही होतोच.  

दिवाळीत १ ग्रॅम सोन्याचं ब्रेसलेट घ्यायचं? बघा हाताचं सौंदर्य खुलविणारे ८ लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स..

याशिवाय रेखा यांनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणी त्या त्वचेसाठी साबणाऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ आणि तेल यांचं एकत्रित मिश्रण वापरायच्या. याशिवाय आठवड्यातून एकदा त्वचेवर चंदनाचा लेप लावणे, पोट स्वच्छ करण्यासाठी कडुनिंबाची चटणी खाणे, एरंडेल तेल घेणे असे काही आयुर्वेदिक उपायही त्या नियमितपणे करायच्या.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीरेखा