Lokmat Sakhi >Beauty > कोण म्हणतं वेणी घालणं म्हणजे काकूबाई?  पाहा सई ताम्हणकरची ग्लॅमरस वेणी, वेणी घालण्याचे ३ फायदे

कोण म्हणतं वेणी घालणं म्हणजे काकूबाई?  पाहा सई ताम्हणकरची ग्लॅमरस वेणी, वेणी घालण्याचे ३ फायदे

Hair care tips: मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) नुकतेच एक फोटो शूट केले असून वेणी फेज.. असं ती त्याला म्हणते आहे.. बघा आता... सई ताम्हणकरही वेणी घालते म्हटल्यावर वेणी घालणं म्हणजे काही काकुबाई टाईप नसणार ना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 06:03 PM2021-12-16T18:03:19+5:302021-12-16T18:14:22+5:30

Hair care tips: मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) नुकतेच एक फोटो शूट केले असून वेणी फेज.. असं ती त्याला म्हणते आहे.. बघा आता... सई ताम्हणकरही वेणी घालते म्हटल्यावर वेणी घालणं म्हणजे काही काकुबाई टाईप नसणार ना..

Actress Sai Tamhankar's glamorous photo shoot with braid, hair care tips, benefits of braid | कोण म्हणतं वेणी घालणं म्हणजे काकूबाई?  पाहा सई ताम्हणकरची ग्लॅमरस वेणी, वेणी घालण्याचे ३ फायदे

कोण म्हणतं वेणी घालणं म्हणजे काकूबाई?  पाहा सई ताम्हणकरची ग्लॅमरस वेणी, वेणी घालण्याचे ३ फायदे

Highlightsकेसांच्या वाढीसाठी वेणी घालणं खूप गरजेचं आहे.दिवसा वेणी घालणं आवडत नसेल तर रात्री घाला... पण केसांचं आरोग्य जपण्यासाठी वेणी घाला... 

केस मोकळे सोडून सर्वत्र जाण्याची आता फॅशन. मग ते एखादं लग्न असो किंवा आपलं रोजचं ऑफिस किंवा कॉलेज. मस्तपैकी केस मोकळे सोडले जातात किंवा क्लचर लावलं जातं.... मग अशा वातावरणात वेणी घालणं, म्हणजे अगदीच काकुबाई प्रकार.. असं बऱ्याच मुलींना वाटतं.. पण लांबसडक वेणीला (benefits of braid in marathi) असं कितीही चिडवलं ना.. तरी वेणीचं सौंदर्य आणि तिचं ग्लॅमर काही कमी होत नाही... कारण एरवी केस मोकळे सोडणाऱ्या अनेक जणीही लग्न- समारंभात स्टाईलीश वेणी घालतात आणि भाव खातात... 

 

आता हेच बघा ना.. सई ताम्हणकरने तिचे नुकतेच ग्लॅमरस फोटो शुट केले आहे. फोटोमध्ये दिसून येणारे तिचे कपडे अतिशय मॉडर्न लूकचे आहेत. अशा ट्रेंडी कपड्यांवर सईने एक छानशी वेणी घातली आहे. समोरच्या बाजूने केसांचा मधोमध भांग पाडून मागच्या बाजूला बरीच खाली तिने ही घट्ट वेणी बांधली आहे.. आपली पारंपरिक वेणी तिच्या या ट्रेण्डी कपड्यांवरही चांगलीच शोभून दिसत असून सईने या फोटोंना Oh I call this the वेणी phase ! असं कॅप्शन दिलं आहे... आता सईने केली आहे तशी वेणी फेज आपल्यालाही करायला हरकत नाही. कारण केसांच्या वाढीसाठी वेणी घालणं खूप गरजेचं आहे. दिवसा वेणी घालणं आवडत नसेल तर रात्री घाला... पण केसांचं आरोग्य जपण्यासाठी वेणी घाला... 

 

केसांची वेणी घालण्याचे फायदे 
Benefits of putting braid
१. केस गळणे कमी होते.. (less hair fall)

रात्री झोपताना अनेक जणी केस मोकळे सोडून झोपतात. यामुळे सकाळी केसांत खूप गुंता होतो. गुंता सोडवताना अनेक केस ओढले जातात आणि गळतात. त्यामुळे असं करण्याऐवजी रात्री झोपण्याआधी केस एकदा चांगले विंचरून सारखे करून घ्या. त्यानंतर केसांची एक सैलसर वेणी घाला आणि मग झोपा. यामुळे केसांचा गुंता कमी होऊन केस गळणेही खूप कमी होते.. 

 

२. केसांची वाढ चांगली होते... (helps in hair growth)
लहानपणी शाळेत जाताना जेव्हा आपण तेल लावून केसांची वेणी घालायचो, तेव्हा आपले केसही चांगले होते. कमी गळायचे आणि झटपट वाढायचे... आता केसांची वाढ खुंटली असेल तर हेच जुनं तंत्र नव्याने वापरून पहा.. सहसा प्रत्येक स्त्री आठवड्यातून दोनदा केस धुते. केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांना छान तेल लावून मसाज करा. केसांचा गुंता काढा आणि एक छान वेणी घाला.. आठवड्यातून दोनदा हा उपाय केला तरी केसांची चांगली वाढ होईल. 

 

३. केस राहतात निरोगी (helps to keep hair healthy)
मोकळे सोडलेले किंवा क्लचर लावलेले केस धुळ, प्रदुषण, ऊन यामुळे लगेच कोरडे, रुक्ष, रखरखीत दिसू लागतात. काही वेळेला बाहेरून आल्यावर तर केसांचा निव्वळ झाडू झालेला दिसतो. असे कोरडे केस लवकर दुभंगतात. त्यामुळेच केसांना अधूनमधून तेल लावा आणि त्यांची चांगली वेणी बांधा. केसांचं मॉईश्चरायझर टिकून राहील आणि ते निरोगी होतील. प्रवास करताना तर हमखास वेणी घालण्याचा पर्यायच निवडावा. तेल न लावता नुसती वेणी घातली तरी चांगला फायदा होतो. 
 

Web Title: Actress Sai Tamhankar's glamorous photo shoot with braid, hair care tips, benefits of braid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.