छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच वेगवेगळ्या करणांवरून चर्चेत असते. कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंचे चर्चे असतात, तर कधी तिच्या दिसण्याचे आणि स्टाईलचे किस्से रंगतात. सध्या सोशल मिडियावर (new fashion trend in saree) जबरदस्त चर्चा सुरू आहे ती श्वेता तिवारीच्या साडीची. श्वेताने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंमधील तिची साडी महिलांचे, तरूणींचे जबरदस्त लक्ष वेधून घेत आहे.
रफल साडी या प्रकारची सध्या तरूणींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ज्या साडीला खालच्या बाजूने पुर्णपणे फ्रिल लावलेल्या असतात, अशी फ्रिल असणारी साडी म्हणजे रफल साडी. अभिनेत्री कतरिना कैफ (actress Katrina Kaif wearing ruffle saree) हिने देखील नुकतीच रफल साडी नेसली होती. (How to drap ruffle saree)
श्वेताने जे फोटो शेअर केले आहेत, त्यात तिने केशरी रंगाची रफल साडी (6 yards ruffle saree) नेसली आहे. साडीचा रंग श्वेताला खूपच खुलून दिसतो आहे. या साडीचे काठ लाल आणि चंदेरी या रंगाचे सॉलिड कॉम्बिनेशन असणारे आहेत. या साडीची किंमत तब्बल ३८ हजार रूपये एवढी असून डिझायनर गोपी वाईद यांनी ही साडी डिझाईन केली आहे. श्वेताने या साडीवर लाल- गुलाबी रंगाचं हाल्टर नेक ब्लाऊज घातलं असून ब्लाऊजवरही पुर्णपणे एम्ब्रॉयडरी केलेली आहे.
रफल साडी हा साडीचा असा एक प्रकार आहे जाे तुम्हाला ट्रॅडिशनल विथ ट्रेण्डी असा लूक देतो. ज्याप्रमाणे ही साडी एखाद्या लग्नात छान दिसते, त्याच प्रमाणे ती एखाद्या वेस्टर्न थीमवर आधारित पार्टीसाठीही परफेक्ट ठरते. त्यामुळेच तर लग्नापासून ते पार्टीपर्यंत सगळ्याच कार्यक्रमांसाठी चालणारी अशा प्रकारची एखादी रफल साडी आपल्या वार्डरोबमध्ये असायलाच हवी. बरं रफल साडी घ्यायची म्हणजे ती श्वेताच्या साडीएवढी महागडीच असेल असे मुळीच नाही. आपल्या शहरातल्या एखाद्या साडीच्या शोरूममध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर रफल साडीचे अनेक प्रकार १५०० रूपयांपासून उपलब्ध आहेत.
video credit- google
रफल साडी नेसण्याचे तीन प्रकार3 styles of draping ruffle sareeसाडी नेसून आपण पदर कसा घेतो, यावरून रफल साडी नेसण्याचे प्रकार ठरतात. - पहिल्या प्रकारात आपण नेहमी जशी साडी नेसतो तशी नेसा. हातावर सिंगल पदर घेताना जसा तो पिनअप करतो तसा करा. त्यानंतर पदराला पुन्हा एक फोल्ड करा आणि दुसरी एक पिन लावा. यामुळे साडीच्या रफल हातावर स्पष्टपणे दिसून येतात.- या प्रकारात नेहमीप्रमाणे साडी नेसून झाली की गुजराती स्टाईलचा पदर घ्या. म्हणजेच पदर उजव्या खांद्यावरून पुढे सोडा. पदराच्या निऱ्या घाला आणि उजव्या खांद्यावर तो पिनअप करा. गुजराती पद्धतीत पदराचा समोरचा डाव्या बाजूचा भाग उचलून तो डाव्याबाजूने मागे खाेचला जातो. यावेळी तसं करू नका. पदर तसाच खाली सोडलेला असू द्या आणि आता साडी व ब्लाऊजवर शोभणारा एखादा मोठा बेल्ट कंबरेवर लावा. - तिसऱ्या प्रकारात आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने जशी साडी नेसतो, तसाच पदर घ्या, फक्त तो रफल दिसतील अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करा.