Join us  

सोनम कपूर सांगते तिच्या दाट- लांब केसांचं सिक्रेट, १ पैसाही खर्च न करता केस होतील मजबूत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 3:42 PM

Best Hair Care Treatment At Home: सोनम कपूर जो उपाय सांगते आहे तो करण्यासाठी एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. (Actress Sonam Kapoor's beauty secret)

ठळक मुद्देसोनम म्हणते रोज रात्री झोपण्यापुर्वी ती हा उपाय करतेच. केसांची चांगली वाढ होण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम आहे, असं तिचं म्हणणं आहे.

बाॅलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिची स्टाईल, फॅशन या सगळ्या गोष्टींची नेहमीच चर्चा असते. सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी ती काय करते, याबाबतही अनेकांना उत्सूकता आहेच. चाहत्यांची ही उत्सूकता लक्षात घेऊन सोनम नेहमीच काही ब्यूटी टिप्स, डाएट टिप्स, फिटनेस टिप्स सोशल मिडियावर शेअर करत असते. सोनमने आता पुन्हा एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. त्यामध्ये तिने ती तिच्या लांबसडक, दाट केसांसाठी काय करते, हे सांगितले आहे. (Actress Sonam Kapoor shared her beauty secret for long and healthy hair)

 

सध्या केसांची समस्या खूपच जास्त वाढली आहे. १० पैकी ७ लोकांना तरी केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेतच. त्यातल्या बहुसंख्य तक्रारी केसांची वाढ, केसांमधला कोंडा आणि केस अकाली पांढरे होणे, याप्रकारच्या असतात.

पांढरे कपडे धुण्यासाठी ५ टिप्स, कपडे जुने झाले तरी पिवळट होणार नाहीत, नेहमीच राहतील चमकदार 

या सगळ्या तक्रारी कमी करून केस छान दाट, लांबसडक करायचे असतील तर सोनम सांगते आहे तो एकदम चकटफू उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दररोज रात्री केसांमधून जवळपास १०० वेळा अतिशय हलक्या हाताने कंगवा फिरवायचा आहे. हा उपाय आपल्याकडे फार पुर्वीपासून केला जातो. पण आता बऱ्याच जणांना तो माहिती नसल्याने मागे पडत चालला आहे. हा उपाय करण्यासाठी बाजारात मिळणारे tangle teezers प्रकारचे हेअरब्रश वापरावे. 

 

सोनम म्हणते रोज रात्री झोपण्यापुर्वी ती हा उपाय करतेच. केसांची चांगली वाढ होण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम आहे, असं तिचं म्हणणं आहे. हा उपाय केल्यामुळे स्काल्पमध्ये योग्य प्रमाणात रक्ताभिसरण होतं. त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.

पोटावर लटकणारी चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम- जो आवडेल तो करा, वजन झरझर उतरेल

शिवाय यामुळे स्काल्पमध्ये काही नैसर्गिक तेल स्त्रवू लागतात जे केसांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असतात. या तेलांमुळे केसांवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. हा उपाय केल्याने स्काल्पवरची डेड स्किन निघून जाते. त्यामुळे कोंड्याचे प्रमाणही हळूहळू कमी होत जाते. शिवाय दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठीही हा उपाय उत्तम आहे. काही दिवस नियमितपणे करून पाहा. केसांना चांगला फायदा होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीसोनम कपूर