Join us  

विद्या बालनचा २७ हजारांचा झेब्रा स्कर्ट, स्ट्रिप्ड डिझाइन्सचा नवा ट्रेंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 2:28 PM

Stylish look of Vidya Balan: नेहमी सोज्वळ साडीत दिसणाऱ्या विद्या बालनचा नवा कुल, स्टायलिश लूक सध्या साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.. क्रॉप ट्रॉप आणि झेब्रा स्कर्ट हा तिचा ड्रेस तब्बल २७ हजार रूपयांचा आहे म्हणे...

ठळक मुद्देविद्याच्या एका वेगळ्याच लूकची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. 

अभिनेत्री विद्या बालन म्हणजे बी टाऊनचा एक गोड चेहरा... छान भरजरी, मोठमोठाले काठ असणाऱ्या, हेवी डिझाईन्सच्या साड्या, तेवढेच सुंदर दागिने असे विद्या बालनने बॉलीवूडमध्ये तिचे एक स्वतंत्र स्टाईल स्टेटमेंट तयार केले आहे. बहुसंख्य कार्यक्रमांमध्ये दिसून येणारा विद्या बालनचा असा लूक नेहमीच चर्चेत असतो आणि तो सगळ्यांना आवडतो देखील.... आता मात्र विद्याच्या एका वेगळ्याच लूकची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. 

 

विद्या बालनने इन्स्टाग्रामवर (instagram) तिचे काही फोटो नुकतेच शेअर केले हाेते. यामध्ये तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि झेब्रा स्कर्ट (crop top skirt fashion) अशा प्रकारचे कपडे घातले आहेत. या फोटोंमध्ये विद्या अतिशय स्टनिंग दिसत असून तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. Ka_sha_india या ब्रॅंडने डिझाईन केलेले कपडे विद्याने घातले असून या कपड्यांची किंमत तब्बल २७ हजार रूपयांच्या आसपास आहे, असे सांगितले जात आहे. 

 

हा क्रॉप टॉप थोडा शॉर्ट असून तो थ्री फोर्थ स्लिव्ह्जचा आहे. व्ही नेकचा हा टॉप विद्याला अतिशय कम्फर्टेबल लूक देणारा आहे. टॉपवर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या लाईन्स असून हा टॉपदेखील झेब्रा लूकप्रमाणे आहे. या टॉपसोबत विद्याने लांब, घेरदार स्कर्ट घातला असून हा स्कर्ट खरोखरंच विद्याचा आणि तिच्या क्रॉप टॉपचा लूक बदलवून टाकणारा ठरला आहे. हा स्कर्ट कॉटनचा असून या स्कर्टला झेब्रा स्कर्ट असं म्हटलं जातं.

 

स्कर्टवर जी नक्षी आहे आणि जो रंग वापरण्यात आला आहे, त्यावरून याला झेब्रा स्कर्ट म्हणण्यात येतं. स्कर्टची सगळ्यात वरची बाजू आहे, त्यावर एक सुंदर हॅण्डमेड डिझाईन करण्यात आली असून स्कर्टचा हा बेल्ट खरोखरंख खूप स्टायलिश लूक देणारा आहे. विद्याने या ड्रेसिंगवर अतिशय न्यूड मेकअप केला असून ॲक्सेसरीजमध्ये फक्त कानातले घातले आहेत. कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूक पाहिजे असल्यास, विद्यासारखी अशी स्टाईल करायला हरकत नाही. 

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनविद्या बालनसोशल व्हायरलइन्स्टाग्राम