Lokmat Sakhi >Beauty > फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स 

फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स 

Aditi Rao Hydari Shared Her Beauty Secret: त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी अदिती राव हैदरी कोणता उपाय करते, याविषयी तिनेच सांगितलेला हा साधा- सोपा उपाय पाहा... (home remedies for young glowing skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 04:59 PM2024-05-28T16:59:08+5:302024-05-28T17:00:21+5:30

Aditi Rao Hydari Shared Her Beauty Secret: त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी अदिती राव हैदरी कोणता उपाय करते, याविषयी तिनेच सांगितलेला हा साधा- सोपा उपाय पाहा... (home remedies for young glowing skin)

Aditi rao hydari shared her beauty secret, home remedies for young glowing skin, use of raw milk for radiant glowing skin | फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स 

फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स 

Highlightsती तिच्या त्वचेची कशा पद्धतीने काळजी घेते, याविषयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी नेहमीच कोणत्या महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घ्याव्या लागतात असं नाही. काही साधे- सोपे घरगुती उपाय केले तरी त्वचेला आपण कित्येक दिवस तरुण, सुंदर, चमकदार ठेवू शकतो. फक्त आपण जे काही उपाय करू ते नियमितपणे करणं गरजेचं आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर महागड्या कॉस्मेटिक्सचा मारा करतात असं नाही (Aditi rao hydari shared her beauty secret). तर बऱ्याच सेलिब्रिटींना अनेक घरगुती, पारंपरिक उपाय करायला आवडतात आणि ते हौशीने करतातही ( home remedies for young glowing skin). त्यापैकीच एक आहे अभिनेत्री अदिती राव हैदरी. ती तिच्या त्वचेची कशा पद्धतीने काळजी घेते, याविषयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (use of raw milk for radiant glowing skin)

 

अदिती राव हैदरीचं ब्यूटी सिक्रेट

अदिती राव हैदरीने त्वचेवरील ग्लो कायम ठेवण्यासाठी तसेच त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ नयेत यासाठी जो घरगुती उपाय सांगितला आहे तो anupriyaa_srivastavaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

आहारतज्ज्ञ सांगतात- लसूण चिरल्यानंतर फोडणीत टाकण्यापुर्वी 'हे' काम करा, तरच शरीराला त्याचे फायदे होतील

यामध्ये अदितीने फक्त २ पदार्थ वापरायला सांगितले आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे कच्चं दूध आणि दुसरा पदार्थ आहे कोणतंही तुमच्या आवडीचं इसेंशियल ऑईल. तिने rosehip ऑईल वापरलं आहे. पण तुम्ही टी ट्री ऑईल, लव्हेंडर ऑईल असंही वापरू शकता. किंवा इसेंशियल ऑईल तमच्याकडे नसेलच तर बदाम तेल, खोबरेल तेल असंही वापरू शकता. 

 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत २ टेबलस्पून कच्चं दूध घ्या. त्यामध्ये ३ ते ४ थेंब इसेंशियल ऑईल टाका. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी

५ ते ७ मिनिटे चेहऱ्याला मसाज करून झाल्यानंतर दुधात कॉटन पॅड बुडवा आणि ते चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी ठेवून द्या. यानंतर चेहरा धुवून टाका. त्वचेवर खूप छान ग्लो तर येईलच पण त्वचा अतिशय मुलायम होईल.

 

Web Title: Aditi rao hydari shared her beauty secret, home remedies for young glowing skin, use of raw milk for radiant glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.