Join us  

भिजवलेले मनुके खाता आणि पाणी फेकून देता ? या पाण्यांत आहे जादू, चेहऱ्यावर येईल तेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 9:09 PM

Raisins For Skin Health: How Raisin Water Promotes Glowing Skin : रात्रभर भिजत घातलेल्या मनुक्यांच्या पाण्यांत आहेत काही खास गुणधर्म, त्वचेवर येईल नवीन चकाकी..

चांगले आरोग्य व तंदुरुस्तीसाठी आपण ड्राय फ्रुटस खातो. आरोग्यासाठी ड्रायफ्रूट्सचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. द्राक्षापासून बनवलेले ड्रायफ्रूट म्हणजेच मनुका या आपल्या आरोग्यासोबतच त्वेचेसाठी देखील तितक्याच फायदेशीर आहेत. मनुका या अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. मनुक्यांमध्ये पोषक तत्व आणि चांगल्या कॅलरीज असतात. रोज मनुके खाल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. आपल्यापैकी बरेचजण रोज रात्री पाण्यांत मनुका भिजत घालून सकाळी ते पाणी पितात व मनुका खातात. मनुक्याचं पाणी प्यायल्याने त्यातील पोषणमूल्य आपल्या शरीराला मिळतात(Raisin Water for Skin- How Can it Add to Your Skin Health?).

मनुक्याचे पाणी जसे आपल्या शरीरासाठी चांगले असते तसेच त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यात देखील त्याचा मोठा वाटा असतो. पोटाचे विकार, रक्ताची कमी यावर गुणकारी म्हणून मनुका आपल्याला माहिती आहेत. पण याच मनुका आपल्या त्वचेच्या आरोग्याबरोबर विविध समस्यांसाठी अतिशय गुणकारी आहे. पण याचा योग्य वापर कसा करावा हे बहुतेकांना माहित नसते. भिजवलेल्या मनुक्याचे पाणी (Why Is Raisin Water Beneficial For Your Skin) चेहऱ्याचा रंग सुधारण्यापासून ते निरोगी बनवण्यापर्यंत महत्वाचे काम करते. असे असले तरीही, त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी या पाण्याचा वापर नेमका कसा करावा? हे पाहूयात(Raisins For Skin Health: How Raisin Water Promotes Glowing Skin).

त्वचेसाठी मनुक्यांचा वापर कसा करावा ? 

१. फेसटोनर :- मूठभर मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून त्यात गुलाब पाणी घालून एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. या पाण्याचा आपण फेस टोनर म्हणून चेहऱ्यावर नियमितपणे वापर करु शकता. 

२. फेसजेल :- भिजवलेले मनुके मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्याची कन्सिस्टंसी कमी करण्यासाठी त्यात पाणी घाला. त्यानंतर त्यात एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. या घरगुती जेलचा वापर केल्याने आपल्या चेहेऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा व सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 

३. फेसपॅक :- एक मोठा बाऊल घेऊन त्यात एक चमचा तांदुळाचे पीठ घाला. आता त्यात एक चमचा मध आणि मनुका भिजवून घेतलेले पाणी घाला आणि द्रावणाची पेस्ट बनवा. आता स्वच्छ चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. 

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

मनुक्याच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेत काय फरक जाणवतो ?

१. मनुक्याच्या पाण्याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्याचा रंग सुधारतो.

२. मनुक्यांमध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने मनुका संसर्गाचा धोका कमी करते.

३. त्वचेच्या डिप क्लिनसाठी मनुक्याचे पाणी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

४. मुरुमांची समस्या असल्यास मनुक्यांच्या पाण्याने चेहरा धुतल्यास या समस्येतून आराम मिळेल.

५. त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी आपण मनुका फेसपॅक व टोनरचा वापर करु शकता. याच्या नियमित वापराने लवकरच आपल्याला त्वचेत फरक दिसून येईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स