Join us  

मेहेंदी लावूनही पिकलेल्या केसांना हवा तसा रंग येत नाही ? जावेद हबीब सांगतात मेहेंदी लावण्याचे १ खास सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2023 1:36 PM

Jawed Habib writes: Tips for hair coloring with henna : हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांना स्वतः केसांना मेंदी लावायला आवडते, केसांना मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत...

आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे केस फारच कमी वयात पांढरे होऊ लागतात. त्यावर केमिकलयुक्त कलर्स लावणे अनेकांना आवडत नाही आणि पांढरे केसही ठेवणे योग्य वाटत नाही. अशावेळी आपल्यापैकी काहीजण हे केसांना मेहेंदी लावण्याचा पर्याय निवडतात. पिकलेल्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या रंगवण्यासाठी आपण मेहेंदीचा वापर करतो. मेहेंदी केसांना नैसर्गिकरित्या काळे, चमकदार आणि मजबूत बनविण्याचे काम करते. डाय आणि कलर यापेक्षा केसाना मेहंदी लावणं हा सुरक्षित पर्याय आहे. मेहंदी लावल्याने केस सुरक्षित राहातात, पांढर्‍या केसांची समस्या मिटते आणि केस सुंदर दिसतात.

मेहंदी ही केसांसाठी कंडिशनिंग आणि कलरिंग असं दोन्ही काम करते. पण चुकीच्या पध्दतीनं मेहंदी लावल्यामुळे मात्र केसांचं नुकसान होतं. केस कोरडे होतात. असं होवू नये म्हणून केसांना मेहंदी लावताना काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात. जर आपल्याला केसांना डाय करायचे नसेल तर आपण मेहंदीचा वापर केसांवर करू शकता. मात्र त्यामुळे केस लाल तर होणार नाहीत ना असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर केसांना मेहंदी कशी लावाववी, केसांवर मेहंदी किती वेळ ठेवावी यांसारखे असंख्य प्रश्न आपल्या मनात उद्भवतात. मेहेंदीचा केसांवर चांगला परिणाम दिसून येण्यासाठी मेहेंदी नेमकी केसांवर कशी लावावी यासाठी सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. जावेद हबीब यांनी इंस्टाग्रामवर स्वतःच्या केसांना मेहेंदी लावतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जावेद हबीब सांगतात मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत(Afraid to apply henna to hair? So know this special method of star hairstylist Javed Habib, which he himself uses).

काय आहे मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत... 

भारतीय सेंद्रिय मेहंदी जी मेंदी म्हणून हातावर लावली जाते, जावेद हबीब सारख्या जागतिक दर्जाच्या हेअरस्टायलिस्टचा त्याच मेहंदीवर खूप विश्वास आहे. जावेद हबीबने इंस्टाग्रामवर या व्हिडिओद्वारे सांगितले आहे की, ते स्वत: केसांना मेंदी लावतात. यामुळे त्यांच्या केसांना जबरदस्त रंग येतो. जावेद हबीब सांगतात, केसांना मेहेंदी लावताना ती भिजवताना मेंदीमध्ये फक्त मोहरीचे तेल आणि पाणी मिसळून मेहेंदी भिजवतो. यामुळे मेहेंदी व्यवस्थित भिजून केसांना लागते. मेहेंदी भिजल्यानंतर ती केसांना लावावी परंतु मेहेंदी चुकूनही कधी कोरड्या केसांवर लावू नये.

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

तांदूळ व मसूर डाळीचा डी - टॅन फेसमास्क, उन्हानं झालेलं टॅनिंग चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

केसांना मेहेंदी लावायच्या आधी केस हलकेच पाण्याने भिजवून घ्यावेत. व या ओल्या केसांवर मेहेंदी लावावी. मेहेंदी लावल्यानंतर आपण तासंतास मेहेंदी केसांवर लावून ठेवतो परंतु तसे न करता, केसांवर मेहेंदी लावून ती केवळ ५ ते १० मिनीटांसाठीच केसांवर लावून ठेवावी. त्यानंतर लगेच केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. अशा योग्य पद्धतीने मेहेंदी भिजवून केसांवर लावल्यांस केसांना भडक लाल, केशरी रंग येण्याऐवजी एक चमकदार रंग देते जो केसांना अधिक आकर्षक आणि स्टायलिस्ट लूक देतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी