Lokmat Sakhi >Beauty > केसांना डाय लावण्याची भीती वाटते? आता घरच्याघरी बनवा नैसर्गिक कॉफी कलर, केसांना येईल नवी चमक

केसांना डाय लावण्याची भीती वाटते? आता घरच्याघरी बनवा नैसर्गिक कॉफी कलर, केसांना येईल नवी चमक

Dye Hair at Home केमिकलवाले कलर्स विसरा, आता वापरा नैसर्गिक हेअर कलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 03:18 PM2022-12-07T15:18:40+5:302022-12-07T15:21:10+5:30

Dye Hair at Home केमिकलवाले कलर्स विसरा, आता वापरा नैसर्गिक हेअर कलर

Afraid to dye your hair? Now make natural coffee color at home, hair will get new shine | केसांना डाय लावण्याची भीती वाटते? आता घरच्याघरी बनवा नैसर्गिक कॉफी कलर, केसांना येईल नवी चमक

केसांना डाय लावण्याची भीती वाटते? आता घरच्याघरी बनवा नैसर्गिक कॉफी कलर, केसांना येईल नवी चमक

प्रत्येकाला आपण एकदा तरी केसांना कलर करावा अशी मनात इच्छा निर्माण होते. केस आपल्या सौंदर्याला अधिक उभारी देतात. जर केसांमध्ये आपण काही बदल केला की आपला लूक पूर्णपणे बदलतो. परंतु, केसांना कलर करण्यापूर्वी मात्र एकदा तरी विचार करावा. कारण केसांना कलर देणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये बऱ्याच प्रमाणावर हानिकारक केमिकल आढळून येतात. जे आपल्या केसांसाठी हानिकारक मानले जातात. आपल्याला केसांना जर नैसर्गिक कलर द्यायचा असेल तर, घरगुती साहित्यांचा वापर करून आपण केसांना कलर देऊ शकता. भारतीयांना कॉफी कलर  प्रचंड आवडतो. जर आपल्याला घरच्या साहित्यात केसांना कॉफी कलर द्यायचा असेल तर ही घ्या सोपी पद्धत.

कॉफी कलर हेअर डाय बनवण्याची पद्धत

स्टेप १

नैसर्गिक कॉफी कलर बनवायचा असेल तर, दोन चमचे हेअर कंडीशनर, दोन चमचे कॉफी पावडर, एक कप पाणी आवश्यक आहे. 

स्टेप २

नैसर्गिक कॉफी कलर बनवणे अत्यंत सोपे आहे. सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवा, त्यात एक कप पाणी टाका. दोन चमचे कॉफी पावडर टाका. त्यानंतर चमच्याने हे मिश्रण एकत्र मिक्स करा. जेव्हा पाणी आणि कॉफीच्या मिश्रणाला उकळी येईल तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात दोन चमचे हेअर कंडीशनर मिसळा. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून एका डब्ब्यात काढून घ्या. 

स्टेप ३ 

केसांना कलर करणारा ब्रश घ्या. आणि तयार मिश्रण ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. ज्या प्रकारे आपण मेहेंदी केसांना लावतो त्याच प्रकारे हे कॉफी मिश्रण केसांना लावा. हे मिश्रण केसांवर एक तास तसेच ठेवा. एक तास झाल्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस चांगले धुवून घ्या. केसांना मस्त कॉफी कलर येईल. केस सुंदर आणि चमकदार दिसतील.

Web Title: Afraid to dye your hair? Now make natural coffee color at home, hair will get new shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.